youth passed away three injured in a accident at shindawane ghat saam tv
क्राईम

Shindawane Ghat Accident News : शिंदवणे घाटात माल वाहतुकीच्या वाहनास अपघात, युवकाचा जागेवरच मृत्यू; तिघे जखमी

झुब्बर रामाश्रय पासवान यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चालक गौतम नामदेव मेमाणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- सागर आव्हाड

Pune :

उरुळी कांचन - जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात माल वाहू वाहनाचा साेमवारी (ता. 8) मध्यरात्री अपघात झाला. या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामधील जखमींना उरुळी कांचन मधील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उरुळी कांचन पोलिस अपघाताचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

उरुळी कांचन पोलिसांच्या माहितीनुसार झुब्बर पासवान व त्यांची दोन मुले, एक कामगार व वाहन चालक हे भंगार मालाचे साहित्य घेऊन सासवड भागातून उरुळी कांचनकडे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास निघाले होते. साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिंदवणे घाटात आले असता चालक गौतम मेमाणे यांना वळणावरील रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला.

या अपघातात पुजन पासवान याच्या डोक्याला, हाताला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात उमेष पासवान, झुब्बर पासवान, दिलीप कुमार व चालक गौतम मेमाणे जखमी झाले आहेत. या अपघातातील उमेष पासवान हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशी माहिती पाेलिसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ४११६ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Local Body Election : काँग्रेस जिल्हाअध्यक्षाचे अपहरण अन् मारहाण, VIDEO ने महाराष्ट्रात खळबळ, हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप

गुवाहाटी टेस्टमधील पराभव जिव्हारी लागणार, WTC Points Table मध्ये पाकिस्तानच्या खाली जाणार भारत, पाहा समीकरण

Mahayuti: अजित पवारांच्या आमदाराकडून काँग्रेसचा प्रचार, महायुतीतील संघर्ष टोकाला

Chanakya niti: दुपारच्या वेळेस का झोपू नये? चाणक्यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

SCROLL FOR NEXT