Crime Saam tv
क्राईम

Doctor death case: डॉक्टर मैत्रिणीला भेटायला रात्री फ्लॅटवर गेला, बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत सापडला; तरुण डॉक्टरचा मृत्यू, हातावरील एका खूणेने संशय वाढला

Prayagraj doctor death: प्रयागराजमध्ये पीजी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मैत्रिणीच्या फ्लॅटमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या डॉक्टरवर उपचार करूनही जीव वाचवता आला नाही. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे.

Surabhi Jayashree Jagdish

प्रयागराजमधून एका डॉक्टरच्या मृत्यूची मोठी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री या तरूण डॉक्टरने संशयितरित्या मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालीये. एका तरुण डॉक्टरचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित राहू लागलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टर हा मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या जनरल सर्जरी विभागात पीजी सेकंड इयर रेसिडेंट म्हणून काम पाहत होता. रविवारी रात्री ड्युटी संपल्यानंतर सुमारे 10 वाजता तो त्याची डॉक्टर मैत्रिण जॉर्जटाउनच्या फ्लॅटवर भेटायला गेला होता. त्याच ठिकाणी तो बेशुद्ध अवस्थेत सापडला होता.

मृत डॉक्टर ज्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला होता तिथे महिला डॉक्टर तिच्या एका मित्रासोबत होती. काही वेळानंतर तो बाथरूममध्ये गेला. मात्र बराच वेळ तो बाहेर आला नाही. इतकंच नाही तर त्याला त्याला आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे महिला डॉक्टरने तात्काळ ओळखीच्या डॉ. सौरभ यांना फोन केला.

डॉ. सौरभ एका ज्युनियर डॉक्टरसह घटनास्थळी पोहोचला. तिघांनी मिळून बाथरूमचा दरवाजा तोडला असता आत डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला. त्याच्या हातावर सलाईन लावल्याचे निशाणही दिसत होते. यावेळी त्याला तातडीने स्वरूपराणी नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याठिकाणी डॉक्टरांनी सुमारे दीड तास त्यांच्यावर सीपीआर दिला. मात्र तरीही त्याची प्रकृती पुन्हा खालावली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.

मृत डॉक्टर हा अल्लापूर परिसरात राहत होते. त्याच्या वडिलांचा औषधांचा व्यवसाय आहे, तर त्यांचा लहान भाऊ बांदा मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

या घटनेची माहिती मिळताच जॉर्जटाउन पोलीस ठाण्याचे प्रभारी रोहित तिवारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, नेमकं मृत्यूचं कारणं काय आहे याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS transfers : महाराष्ट्राच्या प्रशासनात 'बदली' वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

Maharashtra News Live Update: वाशिम मनसेची समृद्धी महामार्गावर आपात्कालीनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला मारहाण

Crime news: बाबानं माझ्यावर बलात्कार केला...! मुलगी रस्त्यावर भीतीनं पळत सुटली, साधूवरील गंभीर आरोपांनी खळबळ

Pune Mall threat : पुण्यातील मॉल उडवून देण्याची धमकी, तो मेल कोणी केला?

Pune BJP : भाजपचा स्थापना दिवस अन् अनधिकृत फ्लेक्सची बजबजपुरी, पुणे महापालिका कारवाई करणार?

SCROLL FOR NEXT