kerala Crime News  Saam Digital
क्राईम

Crime News: सोशल मीडियावर स्वत:ला श्रद्धांजली वाहून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरी अढळला मृतदेह

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

kerala Crime News

केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २८ वर्षीय इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरने मोबाईल स्टेटसवर स्वत:च्या फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येतोय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, अजमल शरीफ असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तो केरळ येथील अलुवा येथे वास्तव्यास होता. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी या तरुणाने आपलं जीवन संपवलंय. मयत अजमलचे इन्स्टाग्रामवर १५ हजारांहून अधिकचे फॉलोअर्स होते.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानूसार, अजमलने टोकाचे पाऊल उचल्यापूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर स्वत:चा फोटो पोस्ट केला होता. तसेच त्यावर त्याने‘RIP अजमल शरीफ १९९५-२०२३.’ असं कॅप्शन लिहिलं होतं. शुक्रवारी(ता.८) सायंकाळच्या सुमारास अजमलने गळ्याला फास लावलेल्या स्थितीत आढळून आला.

अजमलचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबात अधिकचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अजमलच्या रहस्यमयी मृत्यूने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालीये. अचनाक मुलाचं निधन झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजमल कोणत्या मानसिक तणावात होता का? त्याला कोणी त्रास देत होतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

SCROLL FOR NEXT