Yavatmal Crime Saam Tv
क्राईम

Yavatmal Crime: म्हशीला काठीने मारल्याचा राग, दीड वर्षांनी काढला भावाचा काटा, शेतात गाठून जागीच संपवलं

Man Brutally Killed by Cousin: यवतमाळमध्ये सख्ख्या मावस भावानेच तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. म्हशीला मारल्याचा राग मनात ठेवून दीड वर्षानंतर भावाने तरुणाचा काटा काढला.

Priya More

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळमध्ये व्यावसायिकाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मावस भावानेच आपल्या भावाचा काटा काढला. यवतमाळच्या बाभूळगांव पोलिस ठाण्याच्याअंतर्गत येणाऱ्या मिटनापूर येथे ही घटना घडली. दूध व्यावसायिकाची हत्या झाल्यानंतर बाभूळगांव पोलिसांनीआरोपीला काहीतासात अटक केली. हत्या करण्यात आलेल्या व्यावसायिकाच्या सख्ख्या मावस भावानेच हे भयानक कृत्य केले. दोघेही शेजारी शेजारी राहायला आहेत. म्हशीला काठी मारल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. मागील दीड वर्षापासून सुरू असलेला हा वाद गंभीर गुन्ह्यात रूपांतरित झाला आणि त्यातूनच आरोपीने भावाची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, दीड ते दोन वर्षांपूर्वीच्या वादातून यवतमाळमध्ये एका दूध व्यवसायिकाची हत्या करण्यात आली होती. ही घटना १४ एप्रिल रोजी सायंकाळी बाबुळगाव तालुक्यातील मिटनापूर येथील बेंबळा कॅनल परिसरात घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांच आरोपीला जेरबंद केले. मारेकर्‍याला स्थानिक न्यायालयासमोर हजर केले असतात त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सय्यद नजीम सय्यद राऊत असं हत्या करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ते मिटनापूर येथे राहत होते.

सय्यद नजीम सय्यद राऊत यांची हत्या त्यांचा सख्खा मावस भाऊ सय्यद युनुस जावीरने केली. १४ एप्रिलला दुपारी ३ वाजताच्या सुमारात सय्यद नजीम हे नेहमीप्रमाणे म्हशींना चारण्यासाठी गावाजवळ असलेल्या बेंबळा धरणाच्या कॅनलकडे गेले होते. दरम्यान अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला छातीला आणि बगलेत गंभीर दुखापत झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते.

सय्यद नजीम यांचा मृत्यू झाल्याचे समजताच मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. गावातीलच शेख शाहरुख शेख करीम या व्यक्तीला सय्यद नजीम रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी सय्यद यांना बाभुळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान रात्री १० वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेची माहिती बाबुळगाव पोलिसांना मिळतात त्यांनी यवतमाळ गाठले. पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेनंतर त्यांचा भाऊ सय्यद मनसब सय्यद राऊपने स्थानिक पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून अज्ञात मारेकरी विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत संशयित आरोपी सय्यद इनुसला ताब्यात घेतले. या चौकशीतून त्याने सय्यद नजीम यांच्या हत्येची कबुली दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

PM मोदींच्या आवाहनाला मंत्र्यांचा ठेंगा; मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कधी कमी होणार?

SCROLL FOR NEXT