Woman Threatens To Husband  
क्राईम

PUBG खेळताना सूत जुळलं; भेटण्यासाठी १ हजार किमीचा अंतर कापलं, प्रेमासाठी पतीला धमकी देत महिलेनं लेकराला सोडलं

Woman Threatens To Husband : PUBG गेम खेळताना एका महिलेचं एका तरुणासोबत सूत जुळलं. ऑनलाईन प्रियकरासोबत राहण्यासाठी तिने आपल्या पतीला धमकी दिली होती.

Bharat Jadhav

प्रियकरासाठी नवऱ्याला संपवलं, प्रेमासाठी लेकराला आणि पतीला मारलं, अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतील. सोशल मीडियावर हसबँड किलिंग सारख्या घटनांच्या पोस्टही सतत येत आहे. अशात उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडलीय. येथील आराधना नावाच्या महिलेने आपल्या पब्जी प्रियकरासाठी लेकराला सोडत नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिलीय. 'आमच्या दोघांना दूर केलं तर तुझे ५५ तुकडे करू; अशी धमकी महिलेने आपल्या पतीला दिल्याचा प्रकार उघकीस आलाय.

मिळालेला माहितीनुसार, आराधनाचं शिवम नावाच्या मुलाशी ऑनलाइन प्रेम जुळलं. दोघेही पब्जी गेम खेळत होते. पब्जी गेम खळताना दोघांची सूत जुळलं. मग दोघांच्या प्रेमानं सर्व मर्यादा ओलांडल्या. ऑनलाईन भेटलेल्या विवाहित प्रेयसीला भेटायला प्रियकर शिवमने एक हजार किलोमीटरचा प्रवास केला. शिवम आराधनाला भेटायला आला तेव्हा आराधना तिच्यासोबत राहण्यास हट्ट करू लागली. प्रियकरासोबत राहण्यासाठी तिने आपल्या एक वर्षाच्या पोराला नवऱ्याकडे सोडलं आणि नवऱ्याला धमकी दिली.

वृत्तानुसार, शिवम हा पंजाबमधील लुधियाना येथील आहे. तो आराधनाला तिच्या सासरच्या घरी भेटण्यासाठी महोबा येथे आला होता. त्यावेळी आराधनाने तिच्या पती आणि मुलाला सोडून तिच्या ऑनलाइन प्रियकरासह राहण्याचा आग्रह धरला तेव्हा या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. प्रियकरासोबत राहण्यासाठी आराधना हिने तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. आराधनाच्या पतीचं नाव शीलू आहे. जर शीलू तिच्या आणि तिच्या प्रियकराच्या मध्ये आला तर ती त्याचे '५५ तुकडे' (तुकडे) करेल आणि मेरठ खून प्रकरणाप्रमाणेच ड्रममध्ये ठेवेल, अशी आराधनाने पतीला दिली होती.

द फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, लग्नाच्या काही महिन्यांनंतर आराधनाला PUBG गेमचे व्यसन लागले. या गेमद्वारे तिची भेट शिवमशी झाली. शिवम हा लुधियाना, पंजाबचा रहिवासी होता आणि त्यांचे गेमिंग नाते अखेर प्रेमात बदलले. दरम्यान शिवम आणि आराधना यांच्या प्रेम प्रकरण पती शीलूला समजलं होतं. त्यानंतर त्याने तिला मारहाण सुरू केली. पती आपल्याला मारहाण करतो असं जेव्हा आराधनाकडून माहिती पडलं तेव्हा शिवमला राग आवरता आला नाही आणि तो महोबा येथे पोहोचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली १२००० झाडांची कत्तल, गावकऱ्यांना ठेवलं अंधारात

Nagpur Crime : पबमध्ये पार्टीत राडा झाला, ५ जणांनी पहाटे बाहेर गाठले अन् रस्त्यावर हत्या केली

Gemini Yearly Horoscope 2026: प्रत्येक कामात यश, प्रगतीने मार्ग होणार खुले...; जाणून घ्या मिथुन राशींसाठी कसं असणार नवं वर्ष?

Besan Dishes : चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा बेसन पासून बनणाऱ्या या ७ डिशेस

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

SCROLL FOR NEXT