madhya pradesh news saam tv
क्राईम

Crime News: मामीचा कारनामा, १० वर्षे लहान भाच्यासोबत फुर्रर्रर्र...! मंदिरात जाते असं सांगून घरातून निघाली ती परतलीच नाही

Chhatarpur News: मध्य प्रदेशात मामी भाच्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरात जाते सांगून घराबाहेर पडलेल्या महिलेने पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली.

Surabhi Jayashree Jagdish

मध्य प्रदेशाच्या छत्रापूर एक धक्कादायक घटना समोर आलीये. ज्यामुळे लग्नाच्या नातेसंबंधांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. याठिकाणी मामी आपल्या भाच्यासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंदिरात जाऊन येते असं सांगून महिला भाच्यासोबत पळून गेली आहे.

या महिलेच्या पतीने माहिती दिली की, देवळात जाऊन येते असं सांगून ती घराबाहेर पडली आणि त्यांच्या एका तरूण भाच्यासोबत फरार झाली आहे. इतकंच नाही तर त्याची आयुष्यभराची कमाई आणि सर्व दागिनेही घेऊन पळून गेली आहे.

नेमकी घटना काय घडली?

सिजाईमध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय बरे कुशवाहा यांच्या ३५ वर्षीय पत्नीने रविवारी घरातून निघताना विंध्यवासिनी मंदिरात जात असल्याचं सांगितलं होतं. पतीला वाटलं की, देवळात जाऊन आल्यानंतर ती घरी परतेल. मात्र तो पळून जाण्याचा एक कट रचला होता. घरातून निघाल्यानंतर ती महिला मंदिरात जाण्याऐवजी थेट कबराईला गेल्याचं समोर आलं.

आपली पत्नी बराच काळ घरी आली नाही म्हणून पत्नीने कुशवाहाने तिला फोन केला. फोन केल्यानंतर ती त्याच्याशी खोटं बोलली. यावेळी तिने आपण बहिणीच्या घरी गेल्याचं सांगितलं. शिवाय आजची रात्र ती बहिणीच्या घरी राहणार असल्याचं सांगितलं. तो तिथे येत असल्याचं सांगितल्यावर ती फरार झाली. यानंतर तिचा फोनही बंद येत होता.

पोलिसांच्या तपासातून धक्कादायक बाब समोर

यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दिली आणि ज्या बाबी समोर आल्या त्यामधून पतीला धक्का बसला. बरे कुशवाहा यांचा आरोप आहे की, त्यांची पत्नीचे त्यांच्या २५ वर्षीय भाचा कमलेश कुशवाहासोबत प्रेमसंबंध होते. यामुळेच ती पळून गेली आहे. तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या भाच्याच्या आणि त्याच्या मामी या कृत्यामुळे नाते संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

पैसे आणि दागिने घेऊन फरार

बरे कुशवाहाने पोलिसांना सांगितलं की, त्याची पत्नी घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन गेलीये. बरे कुशवाह यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बेपत्ता व्यक्ती आणि चोरीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AFG Test Match: टीम इंडियानं उभारला ५६४ धावांचा डोंगर, गिलचे वादळी शतक, पंतनेही झोडपले

कोरियन मुलींच्या सरळ केसांचे रहस्य काय?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹३००० येणार? मे-जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता, पाहा महत्त्वाची अपडेट

Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; वयाच्या ३३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत हळहळ

आता इंस्टाग्रामसाठी मोजावे लागणार पैसे? 'इंस्टाग्राम प्लस'मध्ये युझर्सना कोणत्या मिळणार सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT