Kolkata Doctor Death Saam Tv
क्राईम

Kolkata Doctor Death: क्रूरतेची हद्द पार! गुप्तांग-डोळ्यातून रक्त वाहत होतं, सरकारी रुग्णालयातच महिला डॉक्टरासोबत आत्याचार, मोठा खुलासा

Satish Kengar

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील सरकारी आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एक अत्यंत क्रूर घटना घडली आहे. येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर आधी अत्याचार आणि नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका व्यक्तीला अटक केली आहे. मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बेशुद्धावस्थेत आढळल्या होत्या. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं.

या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शुक्रवारी आरोपी संजय याला अटक केली आहे. स्थानिक पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरबद्दल सांगितले जात आहे की, ती द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी सेमिनार हॉलमध्ये ती बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पीडित कुटुंबीयांचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं सांत्वन

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितेच्या पालकांशी संवाद साधला आहे. या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करण्याची विनंती कुटुंबीयांनी ममता यांना यावेळी केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मृतदेह शवविच्छेदासाठी पाठवला होतो. या प्रकरणाच्या तपासासाठी बंगाल पोलिसांनी एसआयटीही स्थापन केली आहे.

शवविच्छेदानाच्या अहवालातलैंगिक अत्याचार आणि खून झाल्याचे समोर आले आहे. अहवालात म्हटले आहे की, 'तिच्या डोळ्यातून आणि तोंडातून रक्तस्त्राव होत होता, तिच्या चेहऱ्यावर आणि नखांवर जखमा होत्या. पीडितेच्या गुप्तांगामधून रक्तस्त्राव होत होता. तसेच तिच्या पोटावर, डाव्या पायावर, मानेवर, उजव्या हाताला आणि ओठांवर जखमा होत्या.

शवविच्छेदनादरम्यान दोन महिला साक्षीदार आणि महिलेची आई हजर होती. ही संपूर्ण प्रक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली. कोलकाता पोलिसांच्या आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा गुन्हा पहाटे 3 ते पहाटे 6 दरम्यान घडला. पोलीस याप्रकरणी अधिक तापास करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक डॉक्टर आणि संघटना आक्रमक झाले आहेत. डॉक्टरांनी आंदोलन करून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT