Sharad Mohol killer Saam TV
क्राईम

Sharad Mohol latest news : कुख्यात गुंड शरद मोहोळचे मारेकरी कोण? आरोपींची नावं आली समोर

Who is Sharad Mohol's killer? शरद मोहोळची हत्या पूर्वनियोजित होती. पुण्यातल्या कोथरुडमधील सुतारदरा परिसरात जेथे शरदवर गोळीबार झाला तेथे तेथील सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Ruchika Jadhav

Pune Crime News:

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी भररस्त्यात हत्या झाली. हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवलीत. शरद मोहोळ हत्येप्रकरणी काही आरोपींची नावे देखील समोर आली आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नामदेव कानगुडे (मामा), साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल गांदले, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकात शेळके, विनायक गाव्हणकर, ॲड रवींद्र पवार, ॲड संजय उडान अशी शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपीची नावे आहेत. एकूण आठ आरोपींची नावे समोर आली असून पोलीस या सर्वांची कसून चौकशी करत आहेत. तसेच त्यांना अटकही करण्यात आलीये.

पूर्वनियोजित कट

शरद मोहोळची हत्या पूर्वनियोजीत होती अशी माहिती पोलीस तपासातून समोर येतेय. पुण्यातल्या कोथरुडमधील सुतारदरा परिसरात जेथे शरदवर गोळीबार झाला तेथील सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शरद मोहोळ आपल्या घरातून बाहेर निघाला होता. त्याच्या साथीदारांसोबत तो रस्त्यावरुन चालताना दिसत आहे. मात्र अचानक रस्त्यातच त्याच्यावर त्याच्यासोबत चालणाऱ्या साथीदारांनी हल्ला केला.

कोण होता शरद मोहोळ?

कुख्यात गुंड शरद मोहोळ हा मुळशी तालुक्यातील रहिवासी होता. त्याचे आईवडील शेतकरी असून बेताच्या परिस्थितीत मोठा होऊन, तो गुन्हेगारीकडे वळला. गुन्हेगारी क्षेत्रात सुरुवातीला शरदने कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा ड्रायव्हर म्हणून काम केले. मात्र, याच संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारुपास आला होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

Dussehra Apatya Leaves: दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्यामागे शास्त्र काय आहे?

Kalsubai Fort History: इतिहास, वास्तुकला आणि ट्रेकिंगसाठी खास! वाचा कळसुबाई किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT