washim local crime branch arrests 5 in mahavitran office theft case  saam tv
क्राईम

Washim Crime News : वाशिममध्ये घटना घडली होती, टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ५ जणांना धरलं; अकोला, बुलडाणा कनेक्शन उघड

Mahavitran : 16 जानेवारीला महावितरणची 5 लाखाची ॲल्युमिनियमची तार चाेरीस गेली हाेती. त्याबाबतची तक्रार मंगरूळपीर पोलिसांत नाेंदविण्यात आली हाेती.

Siddharth Latkar

- मनाेज जयस्वाल

Washim News :

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर (mangrulpir) मधील महावितरण विभागातील (mahavitran department) ॲल्युमिनियमची आठ हजार चारशे मीटर विद्युत तारेची चाेरी झाली हाेती. वाशिम स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेने (washim local crime branch) नुकतेच चोरट्याने जेरबंद केले. त्यांच्याकडून 9 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 16 जानेवारी कालावधीत महावितरण कार्यालयाची 5 लाख रुपयांची ॲल्युमिनियमची तार चाेरीस गेली हाेती. त्याबाबतची तक्रार मंगरूळपीर पोलिसांत नाेंदविण्यात आली हाेती.

पाेलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला हाेता. गोपनीय माहितीच्या आधारे वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चाैकशी केली असता त्यांनीच अल्युमिनियम विद्युत तार चाेरी केल्याचे उघडकीस झाले.

या प्रकरणी पाेलिसांनी शेख अन्सार शेख चांद उर्फ बब्बू (राहणार अमडापूर ता. चिखली जिल्हा बुलढाणा), शेख शेहजाद शेख कदीर रा.पातुर जिल्हा अकोला), शेख अकबर शेख अबू कलाम रा. काळेगाव ता. खामगाव जिल्हा बुलढाणा), शेख मोहसीन शेख करीम मोमीनपुरा (रा. मोमीनपुरा पातुर जिल्हा अकोला) आणि शेख सोहेब शेख खलील (रा. मोमीनपुरा पातुर जिल्हा अकोला) यांना अटक केली. पाेलिसांनी एकूण 9 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

China: तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये मुलांना 'या' अनोख्या गोष्टी शिकवल्या जातात

Viral Video: नजर हटी दुर्घटना घटी! बोटीवर चालता चालता तरुणाचा गेला तोल अन्...पाहा पुढे नेमकं काय घडलं

CM Shinde: मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, पण...,CM पदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Singham Again Collection Day 16: 'सिंघम अगेन'ची धमाकेदार एन्ट्री, १६ व्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई, कलेक्शन किती झालं?

Hingoli Vidhan Sabha : भाजपचे निम्मे कार्यकर्ते सोबत; हिंगोलीत अपक्ष उमेदवाराचा खळबळजनक खुलासा

SCROLL FOR NEXT