Mumbai News  Saam tv
क्राईम

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

Wardha Crime News: वर्धा रेल्वे स्थानकावर आलेल्या युवतीला मदतीच्या बहाण्याने बाहेर नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. लोहमार्ग पोलिसांकडून CCTV फुटेज तपासणी आणि संशयितांची चौकशी सुरूय

Bharat Jadhav

  • वर्धा रेल्वे स्थानकावर आलेल्या युवतीसोबत अत्याचार झाल्याचा आरोप समोर आला आहे.

  • मदतीच्या बहाण्याने युवतीला स्थानक परिसरातून बाहेर नेल्याची माहिती आहे.

  • लोहमार्ग पोलिसांकडून CCTV फुटेज तपासून घटनाक्रमाचा मागोवा घेतला जात आहे.

चेतन व्यास, साम प्रतिनिधी

वर्धा रेल्वे स्थानकावर बाहेरगावाहून आलेल्या एका युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २३ सप्टेंबरच्या सायंकाळी युवती वर्धा रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही संशयित युवकांनी मदतीच्या बहाण्याने तिला रेल्वे स्टेशन परिसरातून बाहेर नेले.

त्यानंतर शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केलाय. एका युवकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून संशयित युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे स्वतः वर्ध्यात दाखल झाले असून पीडिता आणि संशयितांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, पीडिता आदिवासी समाजातील असल्याने विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार ही घटना २४ तारखेच्या मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली. तिच्या दाव्यानुसार एकूण ५ ते ६ जणांनी सामूहिक अत्याचार केला. पीडित तरुणी ही चंद्रपूर येथे तिच्या नातेवाईकांकडे गेली होती. तेथून परतताना ती आधी सेवाग्राम आणि त्यानंतर वर्धा स्थानकावर पोहोचली. मात्र ती वर्ध्यात पोहोचली तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

तरुणी स्थानकावर असताना एका ऑटो चालकाने तिला बस डेपोमध्ये सोडण्याच्या बहाण्याने स्टेशनच्या बाहेर नेले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या दोन जणांनी तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित तरुणी कसाबसा धीर धरत पुन्हा स्थानकावर पोहोचली. मात्र, काही वेळातच काही जण पुन्हा आले. तिला जबरदस्तीने परत घेऊन गेले. यावेळी पहिल्यांदा अत्याचार करणारे आरोपीही त्यांच्यासोबत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Pune water cut : पुणेकरांना मोठा धक्का! आजपासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; महापालिकेचा निर्णय

Maharashtra Weather : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान, 'या' दिवशी कोसळणार मुसळधार; हवामान खात्याचा मोठा इशारा

Cancer : भूक कमी झालेय? जठराच्या कॅन्सरचा असू शकतो धोका, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Thusday Horoscope : आज ग्रहांची मोठी उलथापालथ होणार! या ६ राशींचे नशीब फळफळणार; गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT