Drunk Youth Falls Asleep on Railway Track Saam Tv News
क्राईम

दारूच्या नशेत तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर झोपला, ट्रॅकमनने वेळीच बाहेर खेचलं; कर्मचारी रविकुमार यांचं सर्वत्र कौतुक

Drunk Youth Falls Asleep on Railway Track : पुलगावच्या वल्लभनगर येथील रहिवासी असलेला ललित अर्जुन शर्मा हा युवक दारूच्या नशेत संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान वर्धा नदीवरील रेल्वे पुलावर चढून थेट रुळावर झोपला. युवक झोपल्याचं दिसताच तेथील कार्यरत ट्रॅकमनमुळे त्याला तेथून उचलण्याचा प्रयत्न केला.

Prashant Patil

चेतन व्यास, साम टिव्ही

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील वर्धा नदीवरील रेल्वे उड्डाणपुलवर दारूच्या नशेत युवक चढला. हा युवक दारूच्या नशेत चक्क रेल्वे रुळावर झोपला. युवक रुळावर झोपल्याचं निदर्शनास येताच रेल्वे रुळावर कार्यरत असलेला ट्रॅकमन रविकुमार पासवानने सतर्कता दाखवत युवकाचे प्राण वाचवले. ललित अर्जुन शर्मा असं युवकाचं नाव आहे. दरम्यान, रविकुमार पासवान यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पुलगावच्या वल्लभनगर येथील रहिवासी असलेला ललित अर्जुन शर्मा हा युवक दारूच्या नशेत संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान वर्धा नदीवरील रेल्वे पुलावर चढून थेट रुळावर झोपला. युवक झोपल्याचं दिसताच तेथील कार्यरत ट्रॅकमनने त्याला तेथून उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठण्यास तयार नव्हता. काही वेळ प्रयत्न करून युवकाला ट्रॅकमनने रुळाबाहेर खेचले. रुळावर दारूच्या नशेत युवक झोपल्याची माहिती ट्रॅकमन रविकुमार पासवानने अधिकाऱ्यांसह रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत युवकला ताब्यात घेत विचारपूस केली.

रेल्वे पोलिसांनी युवकाच्या नातेवाईकांना माहिती देत त्याला कुटुंबीयांकडे सुपूर्द केलं. घटनेची माहिती शहरात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी पाहण्याची गर्दी केली होती. या रेल्वे उड्डाणपुलावर चढण्यासाठी एक रस्ता आहे. या रस्त्यावरून अनेक नागरिक पुलावर चढतात. यामुळे त्या मार्गाला सुरक्षा कठडे तातडीने लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Wednesday : गणेश चतुर्थीला मिळणार ८ राशींना विशेष लाभ; बुधवारचे राशीभविष्य

Mulher Fort : नाशिकला गेल्यावर करा मुल्हेर किल्ल्याची सफर, ट्रेकिंगसाठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: न्यायालय आम्हाला परवानगी देईल ,आम्ही सगळे नियम आणि अटी पाळून आझाद मैदानावर उपोषण करणार- मनोज जरांगे

Pune School: शिक्षणाचा बाजार मांडलाय यांनी...फी न भरल्यानं शाळेनं विद्यार्थ्यांचे फोटो केले व्हायरल | VIDEO

Dharashiv: स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटात तुफान राडा, दगडफेकीत ५ पोलिस जखमी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT