वर्धामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना
बायकोकडून प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या
गळा दाबून नवऱ्याची हत्या केली
मृतदेह गावातील एका विहिरीत फेकून दिला
वर्धामध्ये बायकोने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली. वर्ध्यातील शेकापूर गावात ही घटना घडली. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे बायकोने हे भयंकर कृत्य केले. गळा आवळून नवऱ्याची हत्या केली त्यानंतर मृतदेह विहिरीमध्ये फेकून दिला. त्यानंतर स्वत: पोलिस ठाण्यात जात नवरा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करत असताना बायकोच्या या कृत्यामुळे पोलिसही चक्रावले. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर बाई येथे प्रेमसंबंधातून ही हत्याकांडाची घटना घडली. प्रेमसंबंधात नवरा अडथळा ठरत असल्याने बायकोने प्रियकराच्या मदतीने त्याची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह गावाजवळील विहिरीत फेकून देण्यात आला. या प्रकरणी बायको सपनासह चार जणांना वडनेर पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येचा कट रचलेल्या बायकोनेच नवरा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.
संतोष पांडुरंग कैकाडे (वय ४२ वर्षे) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी सपना कैकाडेचे संतोषचा चुलत भाऊ शुभम कैकाडे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात संतोष अडथळा ठरत असल्याने सपनाने शुभम कैकाडे आणि त्याचे दोन साथीदार सचिन बसुणे आणि प्रशांत करपे यांच्या मदतीने संतोष यांचा गळा आवळून हत्या केली.
हत्या केल्यानंतर हा प्रकार कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी संतोष यांचा मृतदेह गावाजवळील बोबडे यांच्या विहिरीत फेकून आले. दरम्यान, संतोष बेपत्ता झाल्यानंतर त्यांची बायको सपना हिनेच वडनेर पोलिस ठाण्यात नवऱ्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणाचा छडा लावला. तपासादरम्यान प्रेमसंबंध आणि त्यातून हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
या प्रकरणी देवानंद पांडुरंगजी कैकाडे यांच्या तक्रारीवरून वडनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शुभम रमेशराव कैकाडे, सचिन प्रभाकर बसुणे, प्रशांत रमेश करपे आणि सपना संतोष कैकाडे या चारही संशयित आरोपींना अटक केली. हत्याकांडामागील नेमका घटनाक्रम, हत्येचे कारण आणि इतर बाबींचा वडनेर पोलिसांकडून तपास सुरू आहे. या हत्याकांडामागील आणखी कोणते धक्कादायक खुलासे तपासातून समोर येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.