Crime: दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध, आईने पोटच्या मुलीला संपवलं; उल्हासनगर हादरले

Ulhasnagar Crime: उल्हासनगरमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. आईने मुलीची गळा आवळून हत्या केली. प्रेमसंबंधाला विरोध करत महिलेने भयंकर कृत्य केले.
Crime: दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध, आईने पोटच्या मुलीला संपवलं; उल्हासनगर हादरले
Ulhasnagar CrimeSaam Tv
Published On

अजय दुधाने, उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये आईने पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीचं दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला तरुणीच्या आईचा विरोध होता. मुलगी त्या तरुणासोबत पळून जाण्याच्या तयारीत असताना आईने मुलीची हत्या केली. या प्रकरणी उल्हासगनर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. या घटनेमुळे उल्हासनगर हादरले आहे. पोलिस सध्या पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या कॅम्प १ मधील भैय्यासाहेब आंबेडकर परिसरात ही घटना घडली. याठिकाणी राहणाऱ्या १९ वर्षीय अमृता गरुडचे त्याच परिसरात राहणाऱ्या दुसऱ्या जातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधला अमृताच्या आईचा विरोध होता. तिने अमृताला अनेकदा समजावण्याचा प्रयत्ने केला पण अमृता ऐकायला तयरा नव्हती.

Crime: दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध, आईने पोटच्या मुलीला संपवलं; उल्हासनगर हादरले
Kalyan Crime: कल्याण हादरले! पोलिसावर जीवघेणा हल्ला, आधी काठीने मारहाण नंतर...; VIDEO व्हायरल

याच कारणावरून रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अमृता आणि तिच्या आईचे वाद झाले. वादानंतर अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत होती. त्यावेळी रागाच्या भरात तिची आई आशा गरुडने ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. या घटनेनंतर अमृताच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली.

Crime: दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध, आईने पोटच्या मुलीला संपवलं; उल्हासनगर हादरले
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अमृताचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी आशा गरुडविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली. आईनेच पोटच्या मुलीची हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Crime: दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध, आईने पोटच्या मुलीला संपवलं; उल्हासनगर हादरले
Crime News : पायाचं हाड तुटलं, पण डॉक्टरांनी ऑपरेशन केलं हृदयाचं; दुसऱ्या दिवशी महिलेने गमावला जीव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com