Police investigation underway after a ward boy posing as a doctor caused the death of a 21-year-old woman in Navi Mumbai. saam tv
क्राईम

नवी मुंबईतील संतापजनक घटना! वॉर्ड बॉय बनला डॉक्टर, PCOD वर केला उपचार; २१ वर्षीय महिलेचा मृत्यू

Navi Mumbai Crime Case : एका वॉर्ड बॉयने डॉक्टर असल्याचे भासवून पीसीओडीवर उपचार केले. यामुळे एका २१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना नवी मुंबईत घडलीय.

Bharat Jadhav

  • वाशी येथे बनावट डॉक्टरकडून PCOD वर उपचार

  • इंजेक्शन दिल्यानंतर २१ वर्षीय प्रचिती भुवड यांचा मृत्यू

  • आरोपी संदेश पश्ते हा वॉर्ड बॉय असल्याचा उलगडा

नवी मुंबईतील वाशीमधील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी अंधेरीतील एका 'मुन्नाभाई एमबीबीएस'ला अटक केली आहे. हार्मोनल डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या एका २१ वर्षीय महिलेला इंजेक्शन दिल्यानंतर तिचा मृत्यू झाल्यानंतर वाशीमधील बनावट डॉक्टरचा पदार्फाश झाला. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश पश्ते (वय ३०) असं आरोपी वॉर्ड बॉयचे नाव आहे, तो मानखुर्द येथील रहिवाशी आहे.

. संदेश पश्ते हा अंधेरी येथील एका नर्सिंग होममध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. मृत पावलेल्या महिलेचं नाव प्रचिती भुवड आहे, त्या वाशीमधील सेक्टर ११ येथील गिरीधर निवास इमारतीत राहत होत्या. दरम्यान मृत महिलेचे वडील भिकुराम भुवड यांनी ६ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पश्तेविरुद्ध बीएनएसच्या संबंधित कलमांखाली सदोष मनुष्यवधचा गुन्हा नोंदवला असून त्याला अटक केली आहे. अटकेनंतर पोलिलांनी त्याला न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने सोमवारी त्याला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वाशी एनएमएमसी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे म्हणाले, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या पोस्ट मॉर्टमच्या प्राथमिक अहवालानुसार मृत्यूच्या कारण नोंदवण्यात आले आहे. दरम्यान व्हिसेरा सॅम्पल हिस्टोपॅथॉलॉजीसाठी जतन करण्यात आले असून मृत्यू कशामुळे झाला हे निश्चित करण्यासाठी सॅम्पल कलिना एफएसएलकडे पाठवण्यात आले आहे.

दरम्यान मृत महिलेचे वडील भुवड यांनी आपल्या फीर्यादीत म्हटलं की, त्यांच्या मुलीला पीसीओडी (पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज) झाला होता. आणि त्यांची भाची प्रियांका महाडिक यांनी पश्ते यांच्याकडे उपचार, असं त्यांना सुचवले होते. पश्ते रुग्णाच्या घरी जावून उपचार करतात, असं भाची प्रियांका यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे प्रियांका महाडिक यांनीही त्यांनी त्याच आजारासंदर्भात पश्ते यांच्याकडून उपचार घेतले होते. त्यावेळी प्रियांका महाडिक यांची प्रकृती सुधारली होती.

खात्री पटल्यानंतर भुवड यांनी ५ फेब्रुवारी रोजी प्रचितीच्या उपचारासाठी पश्ते यांची भेट घेतली. दरम्यान पश्ते बारावी उत्तीर्ण आहे. असलेल्या पश्तेला एमेसेट आणि डायनापर इंजेक्शन्स इंट्राव्हेनसद्वारे देण्यात आल्या. प्रचितीची तब्येत बिघडल्याने, तिच्या वडिलांनी, पश्तेसोबत, तिला वाशी येथील एका खाजगी पीकेसी रुग्णालयात नेले, जिथे तिला 'प्रवेश करताच मृत आणले' असे घोषित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'त्या' अधिकाऱ्याला काळ्या यादीत टाका; महापालिका निवडणुका होताच मनसे आक्रमक, नेमकं काय घडलं?

पॅन कार्डच्या नियमात होणार बदल; लाखोंचा व्यवहार करणाऱ्यांनी नियम जाणून घ्या अन्यथा नुकसान होईल

Maharashtra Live News Update: चंद्रपूर महापालिकेवर भाजपचा झेंडा संगीता खांडेकर महापौर, प्रशांत दानव उपमहापौर

Government Job: १० वी शिक्षण झालेल्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

Accident News : लोकल गर्दीचा आणखी एक बळी, बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT