vivek khobragade passed away after he beaten by youth in ramtek near nagpur saam tv
क्राईम

Nagpur Crime News: शोभायात्रा पाहून परतताना युवकाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान जखमी युवकाचा मृत्यू

रामटेक पोलीसांनी खूनाचा गुन्हा नोंद केलेला आहे.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे

Nagpur News :

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे शोभायात्रा पाहून परतताना झालेल्या वादातून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर युवकास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. उपचारादरम्यान युवकाचा मृत्यु झाल्याची माहिती समाेर आली आहे. (Maharashtra News)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार : रामटेक जवळच्या सितापार येथे राहणा-या तरुणाला रामटेक येथील गडमंदीर रस्त्यावर क्षुल्लक कारणावरून काहींनी बेदम मारहाण केली. त्यात एकाला गंभीर दुखापत झाली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. विवेक विश्वनाथ खोब्रागडे (vivek khobragade) असे मृत तरुणाचं नाव असल्याचे पाेलीसांनी नमूद केले.

विवेक खोब्रागडे हा आपल्या मित्रासोबत 25 नोव्हेंबरला रामटेक शोभायात्रा पहाण्यासाठी आलेला होता. तेव्हा रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गडमंदिर रामटेक वरुन मोटार सायकलने डब्बलसिट घरी परत येण्याकरीता निघाले.

तेव्हा गडमंदिरवरुन खाली उतरत असताना रसत्यात संशयित आरोपी मनीष बंडुजी भारती (वय 36, रा.अंबाडा ता.रामटेक) आणि त्याच्या मित्रांनी त्यांची मोटार सायकल थांबवुन तुमचा मोटार सायकलने माझा मोटार सायकलला ठोस मारुन तुम्ही पळुन गेले असे म्हणुन शिवीगाळी केली.

विवेक आणि फैजान खान याला हातबुक्कीने लाताबुक्कीने मारपीट केली. काही वेळांनी फैजानचा भाऊ तेथे आल्यानंतर मनिष भारतीने त्याच्या गाडीचे नुकसान झाल्याचे सांगुन फैजानचा भावाकडुन 10 हजार रुपये घेतले. त्यानंतर फैजान आणि विवेक यांना घरी परत आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळी जखमी अवस्थेतील विवेकला रुग्णाला दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. रामटेक पोलीसांनी खूनाचा गुन्हा नोंद केलेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT