Maharashtra Latest News:  Saamtv
क्राईम

Virar Crime News: विरार हादरलं! विवाहबाह्य संबंधातून महिलेची गळा दाबून हत्या, प्रियकरावर गुन्हा दाखल

Maharashtra Latest News: रागाच्या भरात प्रियकर शेखर कदम याने गळा दाबून धनश्रीची हत्या केली, व तिला चक्कर आल्याचे शेजाऱ्यांना सांगून पळ काढला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर, ता. २५ जून २०२४

विवाहित महिलेची प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. धनश्री आंबडस्कर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणी प्रियकरावर विरार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धनश्री आंबडस्कर ही विवाहित महिला विरार पूर्वेच्या फुलपाडा येथील साईधाम अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिचे शेखर कदम नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. सोमवारी (ता. २४ जून) सकाळी तिचा पती कामावर गेला असताना तिचा प्रियकर शेखर कदम हा तिला भेटायला घरी आला होता.

यावेळी दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच वादातून रागाच्या भरात प्रियकर शेखर कदम याने गळा दाबून धनश्रीची हत्या केली. हत्येनंतर तिला चक्कर आल्याचे शेजाऱ्यांना सांगून आरोपी प्रियकराने पळ काढला. शेजाऱ्यांनी तिला नजीकच्या दवाखान्यात दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी तिला उपचाराआधीच मयत घोषित केल्याने त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. विरार पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

SCROLL FOR NEXT