विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

Manasvi Choudhary

सर्पदंश आणि विंचूदंश

सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी या ऋतूमध्ये किटकांचा आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंश आणि विंचूदंशाच्या घटना घडतात.

Snake Bite Vs Scorpion sting Risk

जिवघेण्या समस्यांची माहिती

सर्पदंश आणि विंचूदंश दोन्ही दंश जीवघेणे असतात, त्यामुळे याविषयीची योग्य माहिती आणि प्रथमोपचार प्रत्येकाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

Snake Bite Vs Scorpion sting Risk

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना का घडतात?

मुसळधार किंवा सततच्या पावसामुळे सापांची जमिनीखालील बिळे पाण्याने भरतात. अशा वेळी सुरक्षिततेच्या शोधात साप बिळांमधून बाहेर येतात आणि मानवी वस्ती, गोडाऊन किंवा शेतातील लाकडांच्या ढिगाऱ्यात लपून बसतात.

Snake Bite Vs Scorpion sting Risk | Social Media

शेतीची कामे

पावसाळ्याच्या दिवसात शेतात पेरणी, नांगरणी कामे सुरू असतात. यामुळे या काळात मानवाचा आणि सापाचा संपर्क येण्याची शक्यता सर्वात जास्त असते, त्यामुळे शेतात काम करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Snake Bite Vs Scorpion sting Risk

सर्पदंशाची प्रमुख लक्षणे

साप चावलेल्या ठिकाणी दातांच्या स्पष्ट खुणा किंवा दोन लहान ठिपके दिसतात.

विषारी सापाच्या दंशामुळे संबंधित जागी तीव्र वेदना, प्रचंड सूज आणि जळजळ होऊ लागते.

विष पसरल्यास श्वास घ्यायला त्रास होणे, डोळ्यांसमोर अंधुक दिसणे, पापण्या खाली झुकणे आणि उलट्या होण्याचा त्रास उद्भवू शकतो.

Snakebite Symptoms | Saam Tv

विंचू चावल्यावर काय होते?

विंचू चावल्यानंतर दंश झालेल्या जागी तीव्र आग आणि असह्य वेदना होतात.

त्या भागावर सुन्नपणा, जळजळ आणि मुंग्या येण्याचा त्रास होतो.

विषारी विंचू चावल्यास अंगावर घाम सुटणे, रक्तदाब वाढणे, चक्कर येणे आणि अस्वस्थ वाटू लागणे या समस्या निर्माण होतात.

Scorpion Sting Symptoms

साप आणि विंचू यांच्या दंशातील फरक

सापाचे विष संपूर्ण शरीरात पसरून नसा, रक्ताभिसरण आणि स्नायूंवर गंभीर परिणाम करते, जे प्राणघातक ठरू शकते.

विंचूचे विष प्रामुख्याने मज्जासंस्थेवर परिणाम करते आणि अत्यंत तीव्र वेदना व जळजळ निर्माण करते

Scorpion Sting Symptoms

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: 22k Gold Mangalsutra: लाडक्या बायकोसाठी 22 कॅरेट सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स

22k Gold Mangalsutra
येथे क्लिक करा..