Husband Knife Attack On Wife Saam Tv
क्राईम

Virar Crime: कामावर जात असलेल्या बायकोला रस्त्यातच घेरलं; नवऱ्याने केला चाकूहल्ला, विरार रेल्वे पुलावरील धक्कादायक घटना

Husband Knife Attack On Wife On Virar Railway Bridge: विरार रेल्वे पुलावर नवऱ्याने बायकोवर चाकूहल्ला केलाय. यामध्ये महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Rohini Gudaghe

विरार रेल्वे पुलावर बुधवारी (३ जूलै) सकाळी वर्शीला शर्मा नावाच्या महिलेवर तिच्या नवऱ्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या २७ वर्षीय महिलेवर तिचा पती शिव शर्मा याने चाकूहल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिलेच्या मानेला आणि हाताला जखमा झाल्या आहेत. या घटनेमुळे विरार रेल्वे स्थानकाच्या पुलावर मोठी खळबळ उडाली होती.

नवऱ्याने केला बायकोवर चाकूहल्ला

वसईमध्ये भरदिवसा एका तरूणीची तिच्या प्रियकराने हत्या केल्याची घटना घडली (Virar Crime News) होती. या घटनेला दोन आठवडेही उलटत नाही, तोच विरारमधून पुन्हा ही धक्कादायक घटना समोर आलीय. जखमी झालेल्या महिलेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नक्की काय घडलं?

पीडित वर्शिला शर्मा नेहमीप्रमाणे विरार रेल्वे पुलावरून कामावर जात (crime news) होती. तेव्हा अचानक तिचा नवरा शिवा याने पाठीमागून वर्शिलावर चाकूहल्ला केला. परंतु सहप्रवाशांनी प्रसंगावधान राखल्यामुळे या महिलेचा जीव वाचला. तिला तातडीने संजीवनी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोलिसांनी शिवाला अटक केली आहे. घरगुती वादातून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली (Virar Railway Bridge) आहे.

वसई रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपीविरूद्ध भादंवि कलम १०९ अन्वये वसई रेल्वे पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्शिला घरकाम करत असल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत ( Husband On Wife) आहे. घरकाम करणारी वर्शिला ही मुंबईत कामावर जात असताना सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास तिच्या नवऱ्याने तिच्यावर चाकूहल्ला केला होता. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे विरारमध्ये चाललंय तरी काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT