Akola News Saam Tv
क्राईम

Akola News : दगडफेक, लाथाबुक्क्यांचा मारा... अकोल्यात तुफान राडा; सहा जण गंभीर जखमी

Akola : अकोल्यातील वाशीम बायपास परिसरात न्यू नितीन बारजवळ शुल्लक कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या राड्यात सहा जण गंभीर जखमी झाले असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यातील वाशीम बायपास परिसरात काल रात्री उशिरा तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शुल्लक कारणावरून निर्माण झालेला वाद हाता[पायीवर गेला. या घटनेत ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील वाशिम बायपास परिसरातील न्यू नितीन बार रेस्टॉरंटजवळ रविवारी रात्री तरुणांच्या दोन गटात शुल्लक कारणावरून वाद उफाळला. छोट्याशा कारणावरून सुरु झालेला हा वाद दगडफेक, लाथाबुक्क्यांचा मारा आणि काठ्यांचा वापर यापर्यंत पोहोचला. काही तरुणांनी तर सिमेंटचे खांब उचलून एकमेकांवर तुटून पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळाले.

या राड्यात एकूण सहा जण जखमी झाले असून, दोन्ही गटातील प्रत्येकी तीन जण गंभीर जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात काही सराईत गुन्हेगारांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

हा राडा इतका भीषण होता की परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या राड्यानंतर रस्त्यावर दगडी, विटा पडल्याचं चित्र समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणातील गुंडांवर शिक्षा होणार का ? तसेच वारंवार दहशत निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीला आळा बसणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Shortage: पुण्यातील हॉटेलचा अजब कारभार! जेवणाच्या बिलात लावले चक्क 'गॅस चार्जेस'; ग्राहकाचा संताप

Accident News : कंटेनरची जोरदार धडक, गाडीचा चेंदामेंदा! तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं?

Sangamner Acid Attack: चिमुरडीवर अॅसिड हल्ला, महिला सुरक्षेवर घाला; महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा येणार?

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या शोभा यात्रेत सहभागी

Success Story: वडिलांचे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकाने दिली UPSC; २१व्या वर्षी IPS; आदर्श कांत शुक्ला यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT