Vangani dacoity case solved by Thane rural police within 12 hours saam tv
क्राईम

पाणी पिण्याच्या बहाण्याने सख्खा पुतण्या काकूच्या घरात शिरला अन् 80 वर्षीय महिलेसोबत घडलं भयंकर!

Vangani dacoity case : पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून ८० वर्षीय वृद्धेचे सोन्याचे दागिने लुटणारा मुख्य आरोपी तिचा सख्खा पुतण्याच निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. कुळगाव-ग्रामीण पोलिसांनी या भयंकर दरोड्याचा अवघ्या १२ तासांत पर्दाफाश करत आरोपी पुतण्यासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

Saam Tv

मयुरेश कडव

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी परिसरात एका ८० वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा कुळगांव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावला आहे. पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून सोन्याचे दागिने लुटणारा मुख्य आरोपी दुसरा कोणी नसून पीडित वृद्धेचा सख्खा पुतण्याच निघाला आहे. पोलिसांनी पुतण्यासह तिघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

२४ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन अनोळखी इसमांनी भाड्याने खोली हवी असल्याचे सांगून वयोवृद्ध महिलेकडे पाणी मागितले. महिलेने पाणी दिल्यानंतर आरोपींनी घरात बळकावणी करत प्रवेश केला. त्यानंतर गळ्यातील सोन्याची माळ आणि हातातील बांगड्या बळजबरीने काढून घेत, जीवे मारण्याची धमकी देऊन ते पसार झाले होते. याप्रकरणी कुळगांव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास करत मुख्य सूत्रधार आणि वृद्ध महिलेचा पुतण्या राजेश शेलार यांच्यासह गणेश भरत सोनवणे आणि शिवम राजदेव पांडे यांना अटक केली. या प्रकरणी एका बालकासही ताब्यात घेण्यात आले असून, ऋषिकेश बांगर नावाचा आणखी एक आरोपी सध्या फरार आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

पोलिसांनी या कारवाईदरम्यान आरोपींकडून लुटलेला सर्व मुद्देमाल यशस्वीरित्या हस्तगत केला आहे. अवघ्या १२ तासांच्या आत या दरोड्याचा पर्दाफाश केल्याबद्दल कुळगांव-ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यातील शिरपूरमध्ये गांजाच्या शेतीवर शहर पोलिसांचा छापा!

Blood Donation Benefits: रक्तदान केल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Saturday Horoscope: या 4 राशींना मिळणार मानसिक समाधान; कामाचा ताणही कमी होणार, वाचा राशीभविष्य

Tukaram Munde : दिवाळीपूर्वी तुकाराम मुंढेची राज्यभरात मोठी कारवाई, तब्बल 18 कोटी रुपयांचा खाद्यतेलसाठा केला जप्त

२०२९ मध्ये पंतप्रधान कोण? अमित शाहांनी थेट नावाचीच केली घोषणा

SCROLL FOR NEXT