Uttarakhand Girl Gang rape Saam TV
क्राईम

Crime News: भररस्त्यातून २२ वर्षीय तरुणीचे अपहरण, जबरदस्ती दारू पाजत धावत्या कारमध्ये अत्याचार; चौघांवर गुन्हा

Uttarakhand Crime News: उत्तराखंडमधून एक संतापजक घटना समोर आली. भावाची वाट पाहत असलेल्या २२ वर्षीय तरुणीचे भर रस्त्यातून तरुणांनी अपहरण केले. त्यानंतर धावत्या कारमध्येच तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर कारमधून तिला बाहेर ढकलून दिलं.

Satish Daud

Uttarakhand Latest Crime News

भावाची वाट पाहत असलेल्या २२ वर्षीय तरुणीचे भर रस्त्यातून तरुणांनी अपहरण केले. त्यानंतर धावत्या कारमध्येच तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर कारमधून तिला बाहेर ढकलून दिलं. अर्धनग्न अवस्थेत तरुणीने पोलीस ठाणे गाठलं. ही संतापजनक घटना उत्तराखंडमधील हल्दवानी जिल्ह्यातील हिरानगर परिसरात घडली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी (Police) ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात असून पुन्हा एकदा महिला सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित तरुणी मुखानी पोलीस स्टेशन परिसरात राहते. रविवारी (४ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ती एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. (Latest Marathi News)

पालम शहराकडे जात असताना पीडितेने ई-रिक्षाने प्रवास केला. त्यानंतर ती सुशीला तिवारी हॉस्पिटल परिसरात भावाची वाट पाहत थांबली. बराच वेळ उलटूनही पीडितेने घरी आईला फोन करून भावाबाबत विचारपूस केली. आईने तिला तिथेच थांबण्यास सांगितले.

दरम्यान, पीडिता भावाची वाट पाहत उभी असताना, आरोपी कारमधून तिथे आले. त्यांनी भररस्त्यातून पीडितेचे अपहरण केले. इतकंच नाही, तर तिला जबरदस्ती दारू देखील पाजली. त्यानंतर चौघांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला.

जवळपास तीन तासानंतर आरोपींनी पीडितेला धावत्या कारमधून बाहेर फेकून दिलं. घटनेनंतर आरोपी फरार झाले. दरम्यान, पीडितेने जवळचे पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे दोन आरोपींना अटक केली असून उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

SCROLL FOR NEXT