क्राईम

Shocking : बंद खोलीत नको त्या अवस्थेत सापडले दोन महिला अन् दोन पुरुष; पोलिसांनी दार उघडताच दृश्य बघून हादरलेच

Uttarpradesh Firozabad Sex Racket Bust News : फिरोजदाबाद येथील आझाद नगर परिसरात देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात दोन महिला आणि दोन पुरुषांना रंगेहात पकडण्यात आले असून ₹४,८०० रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • फिरोजाबादच्या आझाद नगर परिसरात देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश

  • पोलिसांच्या छाप्यात दोन महिला व दोन पुरुष रंगेहात पकडले

  • मुख्य आरोपी महिला अटकेत

  • चारही आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू

Uttarpradesh Firozabad Sex Racket Bust Police उत्तरप्रदेशातील फिरोजदाबादमध्ये एका बंद खोलीत दोन महिला आणि दोन पुरुषांना नको त्या अवस्थेत रंगे हाथ पकडल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे इथे देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचं तपासात उघड झालं. पोलिसांनी संशयित घरावर छापा टाकून चौघांना रंगेहात पकडलं आहे. तसेच गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाईनपार पोलिस ठाण्याला काही गुप्त माहितीदारांनी माहिती दिली होती की, आझाद नगर परिसरात एका घरात देह विक्रीचं रॅकेट सुरु आहे. पोलिसांनी मिळालेली माहिती खरी आहे का? हे पडताळून बघण्यासाठी सापळा रचला. रचलेल्या सापळ्याप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी आझाद नगर परिसरात घरावर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान पोलिसांना एका बंद खोलीत दोन महिला आणि पुरुष निर्वस्त्र अवस्थेत सापडले. तसेच व्हरांड्यावर बसलेली एक महिला "पळा! पोलिस आले आहेत." अशी ओरडू लागली. तिच्या ओरडण्याने आक्षेपार्ह स्थितीत असलेले दोन तरुण खोलीतून बाहेर पळाले आणि पोलिस पथकाने त्यांना पकडले. खोलीतून बाहेर पडणाऱ्या आणखी एका महिलेलाही महिला पोलिस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. मुख्य आरोपी महिलेच्या घरातून अनैतिक कृत्ये चालवत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

छाप्यादरम्यान पोलिसांनी रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक केली आणि तिच्याकडून ₹४,८०० जप्त केले. चौकशीदरम्यान, ऑपरेटरने कबूल केले की तिने त्या महिलेला आपल्यासोबत ठेवले आणि तिच्या ग्राहकांकडून मोठी रक्कम वसूल केली. तिने घटनास्थळी पकडलेल्या ग्राहकांकडून प्रत्येकी ३०० रुपये वसूल केले होते. दरम्यान, अटक केलेल्या दुसऱ्या महिलेने पोलिसांना सांगितले की तिला व्यवसायात सामील होण्यास भाग पाडले गेले. या प्रकरणाबाबत, फिरोजाबाद शहराचे सीओ प्रवीण तिवारी म्हणाले की, अटक केलेल्या चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपला सर्वात मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांचं डॅमेज कंट्रोल निष्फळ, माजी मंत्र्याने साथ सोडत काँग्रेसचा 'हात' पकडला

Tulsi Water Benefits For Weight Loss: झटपट वजन कमी करण्यासाठी प्या तुळशीचं पाणी, आठवडाभरातच जाणवेल मोठा फरक

Hidden Fort In Pune : पुण्यात लपलाय वन डे ट्रेकिंग स्पॉट, 'या' किल्ल्यावरून दिसते सह्याद्रीचे सुंदर दृश्य

Maharashtra Politics: कुणीही असू द्या, ओढून मारू; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याची ठाकरेंच्या आमदाराला थेट धमकी

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून आणखी एका स्पर्धकाची एक्झिट, अवघ्या महिन्याभरात संस्कृतीनं गाशा गुंडाळला

SCROLL FOR NEXT