Uttar Pradesh Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : धक्कादायक! एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळत नव्हता, विद्यार्थ्याने ग्राईंडरने पायाची बोटे कापली, नेमकं प्रकरण काय? वाचा

Uttar Pradesh Crime News : एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अपंग कोट्याचा गैरवापर करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशातील तरुणाने टोकाचा निर्णय घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • एमबीबीएस प्रवेशासाठी तरुणाचा टोकाचा निर्णय

  • अपंग कोट्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न

  • पोलिस तपासात फसवणूक उघड

  • आरोपीवर गुन्हा दाखल; पुढील चौकशी सुरू

एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एका तरुणाने पायाची बोटे कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून ही घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाला एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळत नव्हता. मात्र अपंग कोट्यातून प्रवेश मिळतं असल्याकारणाने या तरुणाने पायाची बोटं कापली. नंतर त्याने अपंग म्हणून एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवण्याचा कट रचला. याप्रकरणी त्याचा डाव उधळून लावतं पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या विद्यार्थ्याचं नाव सूरज भास्कर (वर्षे २४) असे आहे.

जौनपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज भास्करने डी. फार्मा कोर्स पूर्ण केला आहे आणि तो नीटची तयारी करत आहे. अपंग कोट्यातून एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्याने पायाची बोटे कापली. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, सूरजने इंटरनेटवर पाय कापण्याच्या पद्धती शोधल्या. त्यानंतर त्याने ग्राइंडरने पायाची बोटे कापली. त्यानंतर त्याने पायाची बोटे आणि ग्राइंडर जवळच्या विहिरीत फेकून दिले.

पोलिसांनी ग्राइंडर ताब्यात घेतला असून सूरजच्या पायाची बोटे सापडली नाहीत. सूरजची डायरी आणि त्याच्या मैत्रिणीच्या जबाबातून ही घटना समोर आली. दरम्यान सुरजवर देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

सूरजच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले की, सूरजला कोणत्याही परिस्थितीत २०२६ मध्ये एमबीबीएसमध्ये प्रवेश घ्यायचा होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये, तो बीएचयूमध्ये गेला आणि आवश्यक अपंगत्व कागदपत्रे मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. बीएचयूमधून परतल्यानंतर, त्याने स्वतः अपंग होण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या पायाची बोटे कापली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या पतीला टॉर्चर केलं, ते आत्महत्या करणारच नाहीत; जीएसटी अधिकाऱ्याच्या पत्नीचा दावा

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा रद्द

उधार घेतलेले 10000 रुपये कधी देणार? रागाच्या भरात सपासप वार, तरुणाचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू असताना घातपाताचा कट उधळला; 'जैश'च्या दहशतवाद्याला कंठस्नान

Saturday Horoscope: गुंतवणुकीचा होईल फायदा, 4 राशींना होणार आर्थिक लाभ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT