Uttar Pradesh News Saam Digital
क्राईम

Uttar Pradesh News: मजुराच्या खात्यात आले २२१ कोटी, रातोरात झाला अरबपती, अन् आयकर विभागाची आली नोटीस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttar Pradesh News

उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथला एक मजूर रातोरात अरबपती झाला आहे. त्याच्या खात्यात २ अरब २१ कोटी रुपये जमा झाले आहेत. एवढी रक्कम बघून मजुराला धक्काच बसला. मात्र आता ही रक्कम त्याच्यासाठी अडचणीची ठरत आहे. कारण खात्यात रक्कम येताच आयकर विभागाने नोटीस पाठविली आहे.

हा सर्व प्रकार बस्तीतील लालगंज पोलीस स्थानकाच्या हद्दीतील बरतनिया गावातील आहे. येथील शिवप्रसाद विशादच्या घरी आयकर विभागाची नोटीस आली आणि गोंधळाला सुरुवात झाली. शिवप्रसाद दिल्लीत दगड फोडण्याचं काम करतो. मजुरी करून पोट भरत असतानाही आयकर विभागाची नोटीस आल्यामुळे त्याचं संपूर्ण कुटुंब काळजित पडलं. कारण शिवप्रसादच्या बैंक खात्यात २२१ कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. इतकंच नाही तर त्याला सर्व कागदपत्रं घेऊन आयकर विभागाच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

शिवप्रसादला प्रश्न पडलाय की, त्याच्या खात्यात इतके पैसे आले कुठून. आता तो दिल्लीतील काम सोडून गावी आला आहे. शिवप्रसाचं पॅनकार्ड २०१९ मध्ये हरवलं होतं, त्याच्या मदतीने कोणीतरी शिवप्रसादच्या नावाने नकली अकाऊंट काढून हा कारनामा केला आहे. दरम्यान, यासंदर्भात त्याने लालगंज पोलीस स्थानकात माहिती दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बँक खात्याच्या सर्व माहितीसह तक्रार केली आहे. तसेच शिवप्रसादने आयकर विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्नही केला आहे.

याबाबत माहिती देताना शिवप्रसाद म्हणाला की, मी एक सामान्य मजूर आहे. दगड फोडण्याचं काम करतो. एवढ्या पैशांचा व्यवहार कोणी केला याबाबत मला काहीही माहिती नाही. कदाचित माझ्या पॅनकार्डचा कोणीतरी चुकीचा वापर केला आहे. ज्या बँक खात्यात २२१ कोटी ३० लाख रुपये जमा झाले आहेत, ते खातं माझंच आहे. मात्र, कधी आणि कोणी इतका मोठा व्यवहार केला माहिती नाही. माझ्या इतर बँक खात्यात मात्र कोणताही व्यवहार झालेला नाही.

पोस्टाद्वारे आलेल्या नोटीसीत, त्याच्या बँक खात्यात २२१ कोटी रुपये जमा झाल्याचं म्हटलं आहे. ४ लाख ५८ हजार ७१५ रुपये टीडीएस कापण्यात आला आहे. सध्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराच्या प्रकरणाची पोलीस खात्याने आणि आयकर विभागाने चांगलीच दखल घेतली असून तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे. बँक आणि आयकर विभाग एकमेकांच्या संपर्कात असून तपासाच्या आधारावर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Maharashtra News Live Updates : पुण्यात उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT