Pune Crime: ड्रग्जच्या पैशातून सोन्याची खरेदी; ललित पाटीलनं खरेदी केलं होतं ५ किलो सोनं , जाणून व्हाल थक्क

Pune Crime: ललित पाटीलने ड्रग्ज विकून त्या पैशातून सोन्याची खरेदी करत असल्याची माहिती समोर आलीय.
Pune Crime: ड्रग्जच्या पैशातून सोन्याची खरेदी; ललित पाटीलनं खरेदी केलं होतं ५ किलो सोनं  , जाणून व्हाल थक्क
Published On

ड्रग माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदाराला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. पोलिसांकडून भूषण पाटील आणि त्याच्या साथीदारांची चौकशी केली जात आहे. यातून नवं-नवीन खुलासे समोर येत आहेत. ललित पाटीलने ड्रग्ज विकून त्या पैशातून सोन्याची खरेदी करत असल्याची माहिती त्या दोघांच्या चौकशीतून समोर आलीय.(Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याआधी भूषण पाटीलचा साथीदार अभिषेकडून ३ किलो सोने जप्त केले होते. त्यामुळे या आरोपींनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचेही सिद्ध झाले आहे. ललित पाटील आणि भूषण पाटील हे एमडी मोठ्या प्रमाणावर मुंबईतील अनेक "पेडलर" यांना विकायचे.

दरम्यान नवराष्ट्र या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूषण आणि अभिषेकच्या तपासातून ड्रग्स रॅकेटमध्ये अजून काही नावे समोर आली आहेत. मुंबईतील इम्रान शेख आणि गोलू नावाच्या व्यक्तीचे व्यक्ती नाशिकमधून एमडी ड्रग्ज घेत होते. ते ड्रग्ज डिलर असल्याचं समोर आले आहे. तेही मुंबईतून पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. ललित व त्याच्या साथीदारांनी ड्रग्समधून मिळवलेल्या पैशांमधून सोन्यात गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. मोठ्या प्रमाणात त्यांनी सोने खरेदी केल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत ८ किलो सोने खरेदी केल्याचे समोर येत आहे. त्यात तीन किलो सोने जप्त केला आहे. तर भूषण आणि अभिषेक यांच्याकडे केलेल्या तपासात ललितनेही ५ किलो सोने खरेदी केल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन कोटींच्या ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत तपासात १२ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यात ५ जणांना अटक झालीय. तर ललित अजूनही फरार आहे.दरम्यान काल भूषण पाटीलला काल न्यायालयात हजर करण्यात आले होते.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण काय आहे?

२०२० मध्ये अंमली पदार्थ विक्री प्रकरणात, ललित पाटील याला अटक करण्यात आली होती. ललित पाटीलकडून १६ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. पाटील स्वत: अंमली पदार्थ तयार करत होता. नाशिकमधील शिंदे पळसे परिसरात श्री. गणेशाय इंडस्ट्रीज नावाने कारखाना सुरू होता. हा कारखाना ललितचा भाऊ भूषण पाटील चालवत होता. साकीनाका पोलिसांनी हा कारखाना उद्धवस्त केला होता.

नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना चालवणाऱ्या भूषण पाटीलला पुणे पोलिसांनी वाराणसी येथून अटक केली होती. पोलिसांनी नाशिकमधीलकारखान्याची चौकशी केली तेव्हा हा कारखाना ललित पाटीलचा भाऊ भूषण चालवता अशी माहिती मिळाली. यानंतर भूषण पाटीलला फरार होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि नाशिक पोलीस ललित पाटील आणि भूषण पाटील याचा शोध घेत होते. त्यात भूषणला पुणे पोलिसांनी वाराणसीतून अटक केली.

Pune Crime: ड्रग्जच्या पैशातून सोन्याची खरेदी; ललित पाटीलनं खरेदी केलं होतं ५ किलो सोनं  , जाणून व्हाल थक्क
Dada Bhuse News | चौकशीत सत्य समोर येईल, ललित पाटील प्रकरणी दादा भुसेंची प्रतिक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com