Naxal Arrest: गडचिरोलीत एका जहाल नक्षलवाद्यास अटक; ६ लाख रुपयांचं होतं बक्षीस

Gadchiroli News: सहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका नक्षलवाद्याला पोलिसांनी अटक केलीय.
Naxal Arrest
Naxal ArrestSaam Tv

(मंगेश भांदेकर)

Naxalist arrested in Gadchiroli

गडचिरोलीमध्ये पोलिसांनी एका नक्षलवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. या नक्षलवाद्याच्या डोक्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलिसांच्या विशेष अभियान पथकाचे जवान आणि सीआरपीएफ १९१ बटालियनच्या जवानांनी संयुक्त अभियान राबवून या नक्षलवाद्याला अटक केली. (Latest News)

मेस्सो गिल्लू कवडो (वय ५० वर्षे), रा. रेखाभटाळ (गडचिरोली) असे अटक केलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. कवडो याच्यावर खून, जाळपोळ, चकमक असे विविध गुन्हे दाखल होते. शासनाने त्याच्यावर सहा लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. मेस्सो कवडो हा नक्षलवाद्यांच्या सप्लाय टीममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता.

कवडो हा माओवाद्यांना विविध स्फोटक साहित्य, दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करत असायचा. यामुळे कवडोची अटक गडचिरोली पोलीस दलासाठी महत्वाची ठरलेली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी चैतुराम ऊर्फ सुक्कू वत्ते कोरसा नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. आता त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आल्याने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

मेस्सो कवडो हा २०१७ च्या आधी जीवनावश्यक सामान आणून देणे, पोलीस पार्टी आल्याचे निरोप देणे इ. काम करत होता. २०१७ ला सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये सदस्य या पदावर भरती होऊन २०२३ पर्यंत नक्षलमध्ये काम करत होता. त्यानंतर त्याची एसीएम पदावर पदोन्नती झाली होती. कवडो याच्यावर दोन चकमक, दोन खून, जाळपोळ असे गुन्हे दाखल आहेत.

गडचिरोली पोलिसांनी १४ ऑक्टोबर रोजी १६ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका नक्षलवाद्याला पकडलं होतं. चैनुराम उर्फ सुक्क वक्ते कोरचा याला छत्तीसगड येथील नारायणपूर येथे अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चैनुराम कोरसा हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील कांकेर सीमेलगत असलेल्या जारावंडी आणि पेंढरी पोस्टेची घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याआधारे पोलीस स्टेशन जारावंडी हद्दीतील मौजा जारावंडी ते सोहेगाव जाणाऱ्या रोडवरील कूरमावाडा फाट्याजवळ विशेष अभियान पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून त्याला अटक केली.

चैतुराम कोरासा याला कलम ३०७,३५३,१४३, १४८, १२० ब, भादवी ३/२५, ५/२७ भारतीय हत्यार कायदा, ३, ४ भारतीय स्फोटक कायदा, १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा आणि १३, १६,१८ अ युएपीए अॅक्ट अन्वये गुन्ह्यात अटक करण्यात आली. चैनुराम कोरसा हा २६ जून २००० पर्लकोट दलमध्ये सदस्य म्हणून पदावर भरती होऊन सन २००२ कार्यरत होता. मे २०२० मध्ये पोयारकोटी जंगलात झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. या चकमकीमध्ये गडचिरोली पोलीस दलाचे एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक पोलीस अंमलदार शहीद झाले होते.

नक्षली प्रकाश उर्फ देवीदासला अटक

प्रकाश गावडे हा मार्च २००० पासून नक्षल चळवळीत होता. त्याने विविध दलामध्ये काम केले आहे. त्याच्यावर २२ गुन्हे दाखल आहेत. साईनाथ नरोटीच्या हत्येच्या आरोपाखील त्याला १४ मार्च २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती.

Naxal Arrest
Balaghat Forest : हॉकफोर्सची कामगिरी, बालाघाटच्या जंगलात कमलू नक्षलवादी ठार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com