Uttar Pradesh Crime News saam tv
क्राईम

Crime News: बाथरुमध्ये आंघोळीला गेल्या अन्...; १५ वर्ष प्रेमप्रकरण, लग्नाच्या ५ दिवशी भयानक शेवट

Uttar Pradesh Crime News: नवविवाहित बीएएमएस डॉक्टर अर्पिता तिच्या लग्नाच्या अवघ्या 5 दिवसांनंतर संशयास्पद परिस्थितीत बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आली. पंधरा वर्षांच्या प्रेमानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशच्या हरदोईमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. मनाला हेलावून जाणारा प्रेमाचा अंत झाल्याची घटना घडलीय. प्रेमाचा असा शेवट ऐकून आपल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पंधरा वर्षाच्या प्रेमाला कोणाची नजर लागली कोण जाने? लग्नाच्या पाच दिवसातच एक आनंदी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.

पंधरा वर्ष प्रेमात राहिल्यानंतर लग्न केलं आणि लग्नाच्या पाचव्या दिवशी नववधूचा मृतदेह संशयरित्या आढळून आला. या घटनेने नवरदेवाच्या आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मात्र, महिलेचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाहीये. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशाच्या हरदोई येथील ही घटना आहे. येथील BAMS डॉक्टरचं पाच दिवसापूर्वी लग्न झालं होतं. पंधरा वर्ष प्रेमात राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. पण लग्नाच्या पाच दिवसातच डॉक्टरच निधन झालं. नवविवाहित वधू BAMS डॉक्टर अर्पिताचा मृतदेह बाथरूममध्ये संशयास्पद आढळला. सकाळी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्या होत्या, पण परत आल्याच नाहीत. खूप उशीर झाल्याने घरातील सदस्य काळजीत पडले.

मग त्यांनी बाथरूमकडे धाव घेतली. त्यावेळी बाथरुमचा दरवाजा बंद होता. त्याला तोडण्यात आला, त्यानंतर बाथरुममधील भयानक दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकरली. नवविवाहितेच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. मात्र, महिलेचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाहीये. या घटनेबाबत परिसरात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र महिला डॉक्टरच्या मृत्यूबाबत अनेक वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. महिलेचा मृत्यू विजेच्या गीझरचा शॉक लागून झाला असावा असं काही लोक म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Courtroom Drama: इमरान हाश्मीचा 'हक' पाहायला जायचा प्लॅन करताय? त्याआधी ओटीटीवर पाहा 'हे' कोर्टरूम ड्रामा चित्रपट

Maharashtra Live News Update: मरीन लाईन्स परिसरातील इमारतीला आग

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघे ताब्यात, हत्येची सुपारी देणारा बडा नेता कोण?

Ind vs Aus: भारताच्या धारदार गोलंदाजीसमोर बॅटिंग ढासळली; सिरीजमध्ये टीम इंडिया आघाडीवर

Bihar Election: उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव; वाहनांवर दगड, शेणफेक, बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न, मतदानावेळी तुफान राडा

SCROLL FOR NEXT