Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: मुलांना घराबाहेर काढायची,नंतर बॉयफ्रेंडसोबत एका खोलीत...; प्रेमसंबंधाला विरोध केल्यानं नवऱ्याला संपवलं

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली. मृतदेह विहिरीमध्ये फेकून दिला.

Priya More

Summary -

  • महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली

  • अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल

  • मृतदेह रजाईत गुंडाळून विहिरीत फेकून दिला

  • या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली

प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे एका महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने आपल्या नवऱ्याची हत्या केली. या महिलेने छळ करून नवऱ्याला संपवलं. त्यानंतर मृतदेह रजाईमध्ये बांधून एका विहिरीमध्ये फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली. आरोपींना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसंच प्रत्येकी १ लाखांचा दंड ठोठावला. या भयंकर हत्याकांडाच्या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली.

मृत व्यक्तीच्या नातेवाईकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर डुकी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराने सांगितले की, 'मी १३ फेब्रुवारी २०१९ च्या रात्री माझ्या पुतण्याला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो. घरामध्ये फक्त त्याची बायकोच होती. मला पाहून ती खूप घाबरली. पुतण्याबद्दल विचारणा केली असता तिने सांगितले की माझा नवरा कामासाठी बाहेर गेला. संध्याकाळपर्यंत वाट पाहिल्यानंतरही पुतण्या घरी परत आला नाही. त्याचा फोन देखील बंद लागत होता. त्यामुळे आम्ही आसपास त्याचा शोध घेतला. तर त्याचा मृतदेह विहिरीत सापडला.'

तक्रारदाराने असे देखील सांगितले की, 'विहिरीमध्ये रजाईमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह होता. रजाई खोलली तेव्हा पुतण्याच्या गळ्यात दोरी बांधलेली असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याची हत्या झाल्याचे कळाले. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा होत्या. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. माझ्या पुतण्याच्या बायकोचे अनैतिक संबंध होते. याची माहिती त्याने मला दिली होती. त्याने बायकोच्या अनैतिक संबंधाला विरोध केला तर तिने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.'

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत मृत व्यक्तीची बायको, तिचा बॉयफ्रेंड आणि एका व्यक्तीला असे तिघांना अटक केली. घटना घडली तेव्हा मृत व्यक्तीचा १५ वर्षांचा मुलगा तिथेच होता. त्याने सांगितले की, आईचे सुनील कुमारसोबत प्रेमसंबंध होते. तो जेव्हा आमच्या घरी यायचा तेव्हा माझी आई मला आणि माझ्या भावंडांना मारहाण करायची. मी आईच्या प्रेमसंबंधाविषयी वडिलांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी या प्रेमसंबंधाला विरोध केला होता. माझे वडील रिक्षाचालक होता. ते जेव्हा कामासाठी बाहेर जायचे तेव्हा सुनील कुमार घरी यायचा. आई आणि सुनील कुमार एका खोलीत जायचे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT