Prayagraj Fire Case Saam Tv
क्राईम

Crime News: विवाहितेची आत्महत्या; संतापलेल्या माहेरच्या मंडळींना घर पेटवलं, सासू-सासऱ्यांचा होरपळून मृत्यू

Prayagraj Fire Case: विवाहितेच्या आत्महत्येनंतर संतापलेल्या माहेरच्या मंडळीनी सासरचं घर पेटवलं. यामध्ये विवाहितेच्या सासू-सासऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Rohini Gudaghe

Uttar Pradesh Crime Two People Burnt Alive

एका विवाहित महिलेनं सासरी आत्महत्या केली. संतापून माहेरच्या लोकांनी तिच्या सासरचं घर पेटवलं. या आगीत होरपळून तिच्या सासू आणि सासऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती (Uttar Pradesh Crime) मिळतेय. ही घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथून समोर आली आहे. प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील तीनजणांचे अंत्यविधी झाल्याची घटना घडली आहे. (Latest Crime News)

प्रयागराजमध्ये सूडाच्या आगीत दोन जणांना जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली (Prayagraj Fire Case) आहे. माहेरच्या मंडळीने सासरच्या घराला आग लावली. या आगीत सासू आणि सासरे जाळून ठार झाले आहेत. ही घटना का आणि कशी घडली, ते आपण जाणून घेऊ या.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विवाहितेच्या आत्महत्येनंतर सासरचे घर पेटवले

हे प्रकरण मुठीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे सोमवारी (१८ मार्च) रात्री उशिरा अंशिका केसरवाणी ही महिला संशयास्पद स्थितीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून (People Burnt Alive) आली. त्यामुळे तिच्या संतप्त पालकांनी तिचं सासरचं घर पेटवलं. त्यामध्ये अंशिकाची सासू शोभा देवी आणि सासरे राजेंद्र केसरवाणी यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

आगीत अडकलेल्या इतर पाच जणांची पोलिसांनी सुटका केली आहे. विवाहितेच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींवर सुनेचा खून केल्याचा आरोप केला आहे. महिलेचा मृत्यू झाला, त्यावेळी घरात इतर सदस्य उपस्थित (Crime News) होते, अशी माहिती मिळतेय.

सासू सासऱ्यांचा होरपळून मृत्यू

डीसीपी दीपक भुकर यांनी न्युज २४ ऑनलाईनसोबत बोलताना सांगितलं की, त्यांना रात्री ११ वाजता मुठीगंज पोलीस ठाण्यात एका महिलेने सासरच्या घरी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली (Uttar Pradesh Crime News) होती. त्यामुळे संतप्त झालेल्या विवाहितेच्या पालकांनी सासरच्या घराला आग लावली. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच जणांना घराबाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली आहे.

आग आटोक्यात आणल्यानंतर रात्री तीन वाजेच्या सुमारास घराची तपासणी करण्यात आली. यावेली घरामध्ये दोन मृतदेह सापडले. ते मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. मृत अंशिका ही धुमनगंज पोलीस स्टेशन परिसरातील झालवा येथील रहिवासी होती. तिचं लग्न मुठ्ठीगंज येथील व्यापारी अंशूशी झालं होतं. अंशिकाच्या कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटाचे सर्व उमेदवार पिछाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT