Kolhapur Crime News : कोल्हापुरात युवकांच्या गटात राडा, दहा गाड्यांची ताेडफोड; पाेलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात

Kolhapur Latest Marathi News : यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. राजारामपुरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
youth fighting in takala area near kolhapur
youth fighting in takala area near kolhapursaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

पूर्ववैमनसयातून साेमवारी सायंकाळी कोल्हापुरातील टाकला परिसर झोपडपट्टीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तलवारी, काट्या ,कोयते घेऊन सुमारे 50 ते 60 युवकांनी दहशत वाजवली. या टोळक्यांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत टेम्पो, पाच मोटारी, चार दुचाकी अशा दहा वाहनांचे मोठं नुकसान झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापुरातील टाकळा झोपडपट्टी परिसरात साेमवारी सायंकाळी कावळा नाका येथील युवकांच्या गटाने हल्ला केला आहे. रुक्मिणी नगरातील एका शाळेत विद्यार्थ्यांचा वाद आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिस ठाण्यापर्यंत त्याबाबत तक्रार झाली होती.

youth fighting in takala area near kolhapur
Ramdas Athawale: नवीन मित्र आला म्हणून जुन्या मित्राला विसरू नका; रामदास आठवलेंचा भाजपवर राेख

यातील काही मुले कावळा नका येथे राहतात. त्यांच्याकडून टाकळा परिसरातील जाम खांडेकर कॉलनी परिसरातील विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो. त्यामुळे परिसरातील काही युवकांनी साेमवारी सकाळी शाळा परिसरात जाऊन विद्यार्थ्यांना आणि कावळा नाका परिसरातील युवकांना ताकीद दिली होती. (Maharashtra News)

youth fighting in takala area near kolhapur
Dodamarg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन, अस्तित्व अधोरेखित

याचा राग मनात धरून साेमवारी सायंकाळी 50 ते 60 युवकांच्या गटाने काट्या, तलवार, कोयते दगड घेऊन त्यांनी अचानक हल्ला केला. यामध्ये तिथे असणाऱ्या चार चाकी दुचाकी गाड्यांची तोडफोड केली तर काहींनी दगडफेक केली. यामुळे या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याला कळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

Edited By : Siddharth Latkar

youth fighting in takala area near kolhapur
Maharashtra Election 2024 : माेहिते पाटलांनंतर गिरीश महाजन यांची गाडी उदयनराजेंच्या दिशेने वळली, राजे समर्थकांची नाराजी दूर हाेणार? (video)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com