Police investigation underway in Jaunpur after a shocking double murder by son. saamtv
क्राईम

धक्कादायक! जन्मदात्या आई-वडिलांच्या डोक्यात मुलाने घातला वरवंटा; मृतदेहाचे तुकडे गोणीत भरले

Uttar Pradesh Crime Son Brutally Kills Parents : उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये एका मुलाने आपल्या पालकांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड केली.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे एका मुलानेच जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची घटना घडलीय. लोखंडी वरवंट्याने आईच्या आणि वडिलांच्या डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर दोरीने गळा आवळला. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी मुलाला अटक केली आहे. अंबेश असं या मारेकरी मुलाचे नाव आहे. तर श्याम बहादूर आणि बबिता असं हत्या करण्यात आलेल्या आई-वडिलांचे नाव आहे.

का केली हत्या?

कौटुंबिक आणि पैशांच्या वादातून मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत श्याम बहादूर हे त्यांची पत्नी बबिता हिच्यासोबत अहमदपूर गावात राहायचे. त्यांना ३ मुली आणि अंबेश नावाचा एक मुलगा होता. अंबेश आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह कोलकाता येथे राहत होता. दरम्यान अंबेश आणि त्याच्या आई-वडिलांमध्ये पैसे आणि जमिनीवरून वाद होत असायचे.

पोलिसांनी अंबेशची कसून चौकशी केल्यानंतर त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितलं की, त्याने कोरोना काळात एका मुस्लिम मुलीसोबत कोलकाता येथे लग्न केलं होतं. त्याला दोन मुलंही झाली. मात्र त्याचे लग्न कुटुंबियांना मान्य नव्हतं. त्याच्या लग्नावरून घरात रोज भांडणं होत होतं. त्याला त्याच्या बायकोपासून सोडचिठ्ठी घेण्यासाठी दबाव टाकत होते. अंबेशनं त्याचं म्हणणं ऐकलं, तेव्हा पत्नी पोटगीसाठी पैसे मागत होती.

त्यानंतर अंबेशने घरात पैशांची मागणी केली. मात्र आई-वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून वाद वाढला. त्याच वादातून अंबेश याने आई-वडिलांच्या डोक्यात वरवंटा घालून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहांचे तुकडे करून ते गोणीत भरले आणि गोण्यांमध्ये भरलेले मृतदेह पुलावरून नदीत फेकले. आधी लोखंडी वरवंट्याने आईच्या डोक्यावर हल्ला करत तिचा जीव घेतला. त्याचदरम्यान वडिलांनी याबाबत फोन करून कुणालातरी सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यावरही वरवंट्याने हल्ला केला. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्यांची हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

'V' Neck ब्लाउजची क्रेझ; साडीला देईल रॉयल लूक, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

Navi Mumbai : नवी मुंबईच्या लॉजमध्ये नको ते उद्योग, पोलिसांनी उद्ध्वस्त केले देहविक्रीचं रॅकेट; ७ महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT