Meerut Snake Bite Case  
क्राईम

Meerut Snake Bite Case: पती ठरला प्रेमात अडसर; पत्नीने झोपेत दाबला गळा, नंतर अंथरुणात सोडला हजार रुपयाचा साप

Meerut Snake Bite Case : उत्तर प्रदेशातील सौरभ हत्याकांड ताज असताना अजून एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्रेमात अडचण ठरत असलेल्या पतीची पत्नीने हत्या केलीय.

Bharat Jadhav

मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभच्या हत्येच्या घटनेने अवघा देश हादरला होता. ड्रम हत्याकांड प्रकरण ताजे असतानाचा मेरठमध्ये दुसरी भयावह घटना घडलीय. प्रेमात अडचण ठरत असलेल्या पतीला आपल्या रस्त्यातून बाजुला करण्यासाठी पत्नीने क्रूरपणाची सीमा ओलांडलीय. आपल्या प्रियकराच्या मदतीने तिने पतीचा गळा दाबत त्याचा जीव घेतला.

पण सापामुळे त्याचा जीव केल्याचा बनाव तिने केला. पत्नीचा हा बनाव पोस्टमार्टममधून उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मेरठ जिल्ह्यातील बहसुमा पोलीस स्टेशन परिसरातील अकबरपूर सादत गावातील आहे. मृत व्यक्तीचं नाव अमित कश्यप उर्फ ​​मिकी (वय २५ )आहे.

अंथरुणात सोडला साप

अमित कश्यप झोपेत असताना त्याच्या पत्नीने त्याचा गळा दाबला त्यानंतर अंथरुणात विषारी साप सोडला. या सापाने मृत झालेल्या व्यक्तीला १० वेळा दंश केला. सकाळी जेव्हा कुटुंबातील सदस्य उठले तेव्हा त्यांना तरुणाचा मृत्यू झाल्याचं दिसलं. त्यांना त्याच्या हाताखाली एक जिवंत साप होता. शरीरावर साप चावण्याच्या खुणा दिसल्या. त्यामुळे कुटुंबीयांना वाटलं की तरुणाचा मृत्यू साप चावल्याने झाला. परंतु हे पोस्टमार्टममध्ये वेगळंच सत्य समोर आलं.

घटनेच्या दिवशी काय घडलं?

शनिवारी रात्री 10 वाजता अमित कश्यप उर्फ ​​मिकीहा नेहमीप्रमाणे कामावरून घरी आला. जेवल्यानंतर झोपण्यासाठी खोलीत गेला. त्याची पत्नी आणि मुले दुसऱ्या खोलीत झोपले. शनिवारच्या रात्री अमित झोपला असताना पत्नीने त्याचा गळा दाबून त्याचा खून केला त्यानंतर त्यानंतर त्याच्या हाताखाली एक विषारी साप ठेवला.

दुसऱ्या दिवशी अमित सकाळी उठला नाही, तेव्हा त्याला उठवण्यासाठी कंटुंबातील इतर सदस्य त्याला उठवण्यासाठी गेले. त्याला वारंवार हाक मारूनही तो उठला नाही. जेव्हा त्याला हलवले तेव्हा कुटुंबातील सदस्यांना शरीराखाली एक साप आढळला. यावर कुटुंबातील सदस्य घाबरले आणि त्यांनी ओरड सुरू केली.

सापाला काढण्याचा प्रयत्नही केला, पण तो त्याच्या जागेवरून हलला नाही. एका सर्पमित्राला बोलावले. त्याने सापाला पकडले. अमितच्या कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरकडे नेले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या शरीरावर दहा ठिकाणी सापाने दंश केल्याच्या खुणा दिसल्या. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर अमितच्या मृतदेहाचं पोस्ट मॉर्टम करण्यात आले.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

अमितचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अमितच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला. अमितचा मृ्त्यू सापाच्या दंशामुळे नव्हे तर श्वास गुदमरल्याने झाल्याचे उघड झाले. यानंतर संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रथम अमितची पत्नी रविता हिला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान तिने तिच्या प्रियकर अमरदीपचे नाव सांगितलं. सुरुवातीला दोघांनीही पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनीही पोपटाप्रमाणे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

अमित प्रेमात ठरला अडचण

अमरदीपने गुन्हा कबूल करताना सांगितले की, अमित आणि तो मी एकाच गावचे आहेत. ते दोघे टाइल्सचे काम करायचे. ते दोघेही मित्र अमरदीप हा अमितच्या घरी नेहमी जात असायचा. त्यादम्यान अमितची पत्नी रवितासोबत त्याचे सूत जुळले. त्यांचे एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. अमितला त्यांच्या प्रेमसंबंधाविषयी समजलं होतं. याची माहिती त्यांना झाली त्यानंतर त्यांनी अमितला संपवण्याचा कट रचला. अमित आणि रविता यांचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते. रविता ही मुझफ्फरनगरची रहिवासी आहे.

घटनेच्या दिवशी रविता अमितसोबत सहारनपूरमध्ये माँ शकुंभरी देवीच्या दर्शनासाठी गेली होती. परत येताना त्यांनी महमूदपूर शिखेडा गावातील एका सर्पमित्राकडून एक हजार रुपयांचा एक विषारी साप विकत घेतला. मात्र शनिवारी रात्री अमित आणि रवितामध्ये भांडण झालं. त्यावेळी रविताने प्रियकरला याची माहिती दिली आणि अमितला संपवण्याचा कट आखला. घरातले सगळे झोपले असताना रविताने आणि अमरदीपने अमितचा गळा दाबला. यानंतर सापाला बेडवर सोडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT