crime news Saam Tv
क्राईम

Crime News: उत्तर प्रदेशातलं 'गब्बर' हॉस्पिटल; मृतदेहावर उपचार, नातेवाईकांकडून उकळले हजारोंचे बिल

Doctors Treatment On Dead Body: उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. रूग्णालयात डॉक्टरांनी मृत व्यक्तीवर उपचार करण्याच नाटक केलं आहे. त्यानंतर मृताच्या नातेवाईकांना बिल दिलं आहे.

Rohini Gudaghe

UP Crime Doctors Treatment On Dead Body

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोरखपूर (Gorakhpur) जिल्ह्यात एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मृत व्यक्तीचाच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गब्बर सिनेमामध्ये दाखवल्याप्रमाणे गोरखपूर येथील रुग्णालयात डॉक्टरांनी मृत व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार करण्याचं नाटक केलं. रुग्णालयाने औषधे व इतर उपकरणांच्या खर्चाचे बिल वाढतच ठेवले. अखेर मृतदेह ताब्यात देताना रुग्णालय प्रशासनाने उपचारासाठी खर्च झालेल्या रकमेचे बिल पीडित कुटुंबाला दिल्याची घटना घडली आहे. (Latest Crime News)

कुटुंबीयांकडून जास्तीत जास्त पैसे वसूल करता यावेत, यासाठी रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीसस हॉस्पिटलमध्ये मृतदेहावर उपचार सुरू (Doctors Treatment On Dead Body) होते. मृत व्यक्तीला व्हेंटिलेटरवर झोपवून उपचार केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पीडितेच्या कुटुंबीयांना ६० हजार रुपयांचं बिल सुपूर्द केलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रूग्णालयात मोठी हेराफेरी

रुग्णालयाच्या (Hospital) या हेराफेरीबाबत डीएमने कडकपणा दाखवला आहे. त्यांच्या सूचनेवरून शहर दंडाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय सील करण्यात आलंय. तसंच ६ व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती टीव्ही९ च्या वृत्तानुसार मिळत आहे. बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. चांगल्या उपचाराच्या नावाखाली टोळीचे सदस्य १५ ते २५ हजार रुपये घेतात.

रुग्णालयामध्ये उपचाराच्या नावाखाली होणाऱ्या हलगर्जीपणाविरोधात शहर प्रशासनाने कठोरता दाखवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कोणीतरी एसपी सिटी कृष्ण कुमार बिश्नोई यांना माहिती दिली की, मेडिकल कॉलेजमधील एका रुग्णाला ॲम्ब्युलन्समधून पडलेगंजमधील जीसस हॉस्पिटलमध्ये पाठवले जात (Crime News) आहे. त्यांनी एका हवालदाराला या घटनेची माहिती घेण्यासाठी पाठवले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

मृतदेह उपचार सुरू

त्यांनी तत्काळ डीएम कृष्णा करुणेश यांना याची माहिती दिली. डीएमच्या सूचनेवरून सीएमओ डॉ. आशुतोष दुबे आणि सिटी मॅजिस्ट्रेट मंगलेश दुबे पडलेगंज येथील हॉस्पिटलमध्ये पोहोचले. अनेक रुग्णांना तेथे आणून उत्तम उपचाराच्या (Doctors Treatment) नावाखाली दाखल करण्यात आले. यापैकी बिहारमधील भागलपूर येथील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय शिवबालक यांचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटल व्यवस्थापन त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून कुटुंबाकडून पैसे उकळत होते.

ही परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी तातडीने इतर दाखल रुग्णांना बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले. तसेच जीसस हॉस्पिटलला अधिकाऱ्यांनी सील (Uttar Pradesh Crime News) ठोकले. तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे रामगड पोलिसांनी रुग्णालयाचे संचालक आणि रियाओन गावप्रमुख नितीन यादव, त्याचा भाऊ मोनू, बीआरडी मेडिकल कॉलेजचे कंत्राटी कर्मचारी दिनेश, डॉ आरपी सिंग यांच्यासह ६ जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT