Crime news Saam Tv
क्राईम

Shocking News: खळबळजनक! भाजप नेत्याच्या मुलीची आत्महत्या, विनयभंगाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

Bjp Leader Daughter End Her Life: भाजप महिला मोर्चाच्या नेत्याच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.

Rohini Gudaghe

Uttar Pradesh Crime News

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) गुन्हेगारी चांगलीच वाढली आहे. खून, बलात्कार, दरोडा, विनयभंग अशा घटना सारख्या समोर येत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना रामपूरमधून समोर आली आहे. एका भाजप नेत्याच्या आठवीत शिकणाऱ्या मुलीने विनयभंगाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. (Latest Crime News)

भाजप महिला मोर्चाच्या नेत्याच्या मुलीने मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या (Uttar Pradesh Crime) केली. ही मुलगी आठवीत शिकत होती. विनयभंगाला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचे सांगितलं जात आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

आरोपी अनेक दिवसांपासून विद्यार्थिनीला त्रास देत होता. त्याने तिच्यावर एकदा बलात्काराचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. आरोपीने पीडितेचा एक अश्लील व्हिडिओ बनवला (Bjp Leader Daughter End Her Life) होता. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची सारखी धमकी तो पीडितेला देत होता. त्यामुळे पीडिता घाबरली होती. आरोपीच्या सततच्या छळाला कंटाळून तिने जीवन संपवलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रामपूरमध्ये आठवडाभरात दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस ठाणे आणि अँटी रोमिओ पथकही हे थांबवू शकलेले (Crime News) नाही. आठवडाभरात जिल्ह्यातील ही दुसरी घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दुसऱ्या घटनेची बळी ही सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याची मुलगी आहे.

यापूर्वीची घटना

यापूर्वी शहजादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशीच घटना घडली होती. एका तरूणीने विनयभंगाला कंटाळून जीवन संपवलं होतं. ही घटना शहजादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली (Latest Crime News) होती. 19 वर्षीय पीडित तरूणी मिलकच्या पदवी महाविद्यालयात बीएच्या द्वितीय वर्षात शिकत होती. तिची परीक्षा चालू होती. ती २७ जानेवारीला परीक्षा देणार होती.

त्यांच्याच गावातील देवेंद्र नावाचा तरूण रेल्वे क्रॉसिंगवर उभा होता. त्याने विद्यार्थिनीला थांबवून तिचा विनयभंग (Molestation)केला. तिने विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तो घटनास्थळावरून पळून गेला होता. या तरुणाने याआधीही तिला वाटेत अडवून अनेकदा तिचा छळ केला होता. त्याच्या या कृत्याला कंटाळून पीडितीने टोकाचं पाऊल उचललं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

SCROLL FOR NEXT