Uttar Pradesh Saam tv
क्राईम

Crime: मित्राच्या ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, सोबत दारू प्यायले; नंतर चिमुकलीला खेळायला बाहेर घेऊन गेला अन्...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. वडिलांच्या मित्राने हे भयंकर कृत्य केले. खेळायला सोबत घेऊन गेला आणि आरोपीने मुलीवर बलात्कार केला.

Priya More

उत्तर प्रदेशमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या मित्रानेच हे भयंकर कृत्य केले. आरोपी ५ वर्षांच्या मुलीला खेळण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. मुलीची अवस्था पाहून कुटुंबीय प्रचंड घाबरले. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लखनऊच्या इंदिरानगर परिसरात घडली. आरोपी आणि पीडित मुलीचे वडील दोघेही बिहारचे राहणारे आहेत. आरोपी आणि मुलीचे वडील दोघेही मित्र आहेत. दोघे सोबतच शटरिंगचे काम करतात. शनिवारी रात्री आरोपी पीडित मुलीच्या घरी आला. तिच्या वडिलांसोबत तो दारू प्यायला. त्यानंतर आरोपीने त्याच्या मित्राला सांगितले की तुझ्या मुलीला खेळायला बाहेर घेऊन जातो. आरोपीने मित्राच्या घरापासून काही अंतरावर मुलीला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो पळून गेला.

रक्ताने माखलेली मुलगी रडत रडत घरी आली त्यानंतर तिने आरोपीने तिच्यासोबत केलेल्या भयंकर कृत्याची माहिती आई-वडिलांना दिली. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी पीडित मुलीला सोबत घेऊन पोलिस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिांनी काही तासांच आरोपीला अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर आरोपी घरातून पळून गेला. पोलिसांनी आरोपीच्या घरी धाव घेतली तर त्याची बायकोच घरी होती. पोलिसांनी तिची चौकशी केली त्यानंतर आरोपीच्या मोबाइलवर कॉल केला पण तो उचलत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत घटनेच्या अवघ्या ७ तासांच्या आत त्याला अटक केली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT