Minor Student Missing Saam Digital
क्राईम

Crime News: '5 वर्षे गायब राहणार, श्रीमंत होवून परतणार,' व्हाट्सअप चॅटिंगनंतर २ अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ता, काय आहे प्रकरण?

Minor Student Missing: उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून दोन अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असताना विचित्र माहिती समोर येतेय, आपण हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊ या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttar Pradesh Minor Students Missing

कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी दोन अल्पवयीन मित्र आपापल्या घरातून बेपत्ता (Minor Student Missing) झाले. हे दोघेही दहावीचे विद्यार्थी आहेत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्यांचा काहीही पत्ता लागला नाही. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्यात आला. परंतु त्यांची कोणतीही माहिती मिळालेली नाही. (latest crime news)

या दोघांचाही शोध घेतला जात आहे. बेपत्ता झालेल्या तरुणाच्या बहिणीच्या मोबाईलवर खंडणीचा मेसेज आला. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांना बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांची चॅटिंग सापडली आहे. त्या व्हाट्सअप चॅटमध्ये जे लिहिलं होतं, ते ऐकून घरच्यांना आश्चर्याचा धक्काच बसला (Uttar Pradesh Crime) आहे. पोलीस बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. लवकरच विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं जाईल, असं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिलंय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बहिणीच्या मोबाईलवर खंडणीचा मेसेज

गायब झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी मूळचा इटावा येथील रहिवासी आहे. तो कानपूरच्या गोविंदनगर भागात आपल्या कुटुंबासह राहतो. तो दहावीचा विद्यार्थी आहे. बुधवारी तो तोंडी परीक्षा देण्यासाठी शाळेत गेला होता. मात्र, सायंकाळपर्यंत घरी परतला नाही.

घरच्यांनी त्याचा शोध घेतला तेव्हा त्याचा मित्रही घरातून बेपत्ता असल्याचं आढळून आलं. दोघांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला. शनिवारी बेपत्ता असलेल्या एका विद्यार्थ्याच्या बहिणीच्या मोबाईलवर दोन लाख रुपयांच्या खंडणीचा मेसेज (Uttar Pradesh Crime) आला. त्यानंतर कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. हा मेसेज इंटरनेटवरून पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आलंय.

पोलिसांनी तपासाला गती दिली

ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी तपासाला गती दिली (Uttar Pradesh Minor Students Missing) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावतपूरजवळ बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, दोन्ही विद्यार्थी दुचाकीवरून रेल्वे स्टेशनकडे जाताना दिसले. या बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Bihar Election Result: २२७१ लोकांचा विश्वास… पण नियतीचा क्रूर खेळ; मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT