Kanpur Dehat: Skeletons of missing brother-in-law and sister-in-law found in the forest, police suspect tragic love story behind the deaths. saam tv
क्राईम

UP Crime: प्रेमाचा भयानक अंत; बेपत्ता दाजी अन् सालीचा जंगलात आढळला सांगाडा

Missing Man and Woman Found Dead in Forest: कानपूर देहात येथील जंगलात एका व्यक्तीचा आणि एका महिलेचा विद्रूप मृतदेह आढळले. आधार कार्ड आणि मुलीचे कपड्यांवरून दोन्ही मृतदेहांची ओळख पटलीय. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Bharat Jadhav

  • कानपूर देहातमधील जंगलात दोन सांगाडे सापडलेत.

  • मृतदेहाजवळ विषारी पदार्थाची पुडी आणि ग्लास आढळला आहे.

  • पोलिसांनी पंचनामा करून आत्महत्येचा गुन्हा नोंदवलाय.

उत्तर प्रदेशातील कानपूर देहातमधील मूसानगरमध्ये एक भयानक घटना घडलीय. येथील जंगलात एका व्यक्तीचा आणि महिलेचा मृतदेह आढळलाय. महिला आणि व्यक्तीचं नातं दाजी आणि सालीचं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलिसांना मृतदेहाजवळ विषारी पदार्थाची पुडी आणि एक ग्लास आढळून आल्यानं परिसरात खळबळ माजलीय. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करत आत्महत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी किशवा दुरौली गावाजवळी जंगलात गुरे चराई करणाऱ्यांना एका तरुणाचं आणि एका मुलीचं कुजलेलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला. त्यानंतर गुरे चराई करणाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सीओ भोगपूर संजय सिंह आणि मुसानगर कालीचरणमधील पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले.

झडती दरम्यान पोलिसांना तरुणाच्या खिशात एक आधार कार्ड सापडले. कार्डवरील नाव आणि पत्त्यावरून पोलिसांनी राजपूर पोलिस स्टेशन परिसरातील खरताळा येथील रहिवासी महावीरशी संपर्क साधला. महावीरने त्या तरुणाची ओळख त्याचा मुलगा उमाकांत (२२) अशी केली.

कपड्यांवरून मुलीची ओळख पटली

उमाकांतच्या मृतदेहाशेजारी १६ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता. ही मृत मुलगी उमाकांतची साली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, मुलगी आणि उमाकांत २५ सप्टेंबर रविवारपासून बेपत्ता होते.

घटनास्थळी सापडलेल्या विषारी पदार्थावरून आणि परिस्थितीवरून, पोलिसांना संशय आहे की, दोघांनीही विषाचे सेवन करून आत्महत्या केली असावी. दोघांमधील प्रेमसंबंधातून ही हत्या झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसापूर्वी या दोघांचा मृत्यू झाला असावा. दोघांनी आधी विषारी पदार्थाचे सेवन केलं असेल. त्यानंतर ते खाली पडले आणि तेथेच पडून राहिले असावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT