Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: 'डोळे बंद कर, तुला सोन्याचा हार आणलाय', तरुणाने गर्भवती बायकोची गळा चिरून केली हत्या

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने गर्भवती बायकोची निर्घृण हत्या केलीची धक्कादायक घटना घडली. सोन्याचा हार आणल्याचे सांगत आरोपीने बायकोला डोळे बंद करायला सांगितले नंतर तिची गळा चिरून हत्या केली.

Priya More

उत्तर प्रदेशमध्ये नवऱ्याने गर्भवती बायकोची चाकूने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरोपीने आपल्या ५ महिन्यांच्या गर्भवती बायकोसोबत हे भयंकर कृत्य केले. 'तुझ्यासाठी सोन्याचा हार आणला आहे. डोळे बंद कर.', असे म्हणत आरोपीने बायकोची हत्या केली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविशंकर आणि सपना यांचे लग्न याच वर्षी जानेवारी महिन्यात झाले होते. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. सपना गर्भवती राहिली. नवऱ्यासोबत होणाऱ्या भांडणामुळे आणि सासरची मंडळी सतत त्रास देत असल्यामुळे सपना आपल्या बहिणीच्या घरी राहायला गेली होती. सपनाचा नवरा रविशंकर शनिवारी तिथे पोहचला. तो डायरेक्ट सपनाच्या खोलीमध्ये गेला. नवऱ्याला पाहून सपना डचकली. त्यानंतर रविशंकरने खोलीचा दरवाजा बंद केला.

यावेळी रविशंकरने सपनाला डोळे बंद कर मी तुझ्यासाठी सोन्याचा हार आणला असल्याचे म्हणाला. तिने डोळे बंद करताच त्याने तिचा गळा चिरला. सपना जीव वाचवण्यासाठी भीक मागत राहिली पण रविशंकर तिच्यावर चाकूने हल्ला करत राहिला. सपनाचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील सर्वजणांनी तिच्या खोलीकडे धाव घेतली. तोपर्यंत सपनाचा मृत्यू झाला होता. सप्नाची हत्या करून तिचा नवरा तिथेच बसून राहिला. त्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.

पोलिस चौकशीदरम्यान, आरोपी रविशंकरने बायकोच्या हत्येमागचं कारण सांगितलं. सपनाचे तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. लग्नानंतर ती माझ्या घरी कमी तिच्या बहिणीच्या घरी जास्त राहत होती. तीजच्या दिवशी तिला नको जाऊ म्हणालो तरी देखील ती बहिणीच्या घरी आली. त्यामुळेच मला प्रचंड राग आला. रागाच्या भरात मी चाकू घेऊन गेलो आणि तिची हत्या केली.'

या प्रकरणात मृत सपनाच्या कुटुंबीयांनी आरोपी नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहे. 'तिचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. माहेरून २ लाख रुपये घेऊन ये असे म्हणत नवरा तिला त्रास देत होता. तिला तिचे सासू-सासरे आणि दोन नणंद मारहाण करत होते. त्यांनी तिला घरातून बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न केला होता.', असा आरोप हत्या झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paan Sharbat Recipe : बाहेरून थकून आल्यावर प्या गारेगार 'पान सरबत', मिनिटांत व्हाल रिफ्रेश

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही - मनोज जरांगे पाटील

Kajol : "नमस्कार सगळ्यांना..."; पुरस्कार मिळाल्यानंतर काजोलनं 'मराठी' भाषेत व्यक्त केल्या भावना, पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी, २७ लाख 'लाडकी'ची आजपासून पडताळणी,अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार!

अकोल्यात धक्कादायक घटना, पत्नी-सासरच्यांच्या छळामुळे तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या, व्हिडीओतून गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT