Biloachpura village incident: Husband and in-laws thrash wife and her alleged lover. saamtv
क्राईम

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Shocking Incident in Baghpat : उत्तर प्रदेशातील बागपतमधील बिलोचपुरा गावात एक धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकरला जबर मारहाण केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • बागपत जिल्ह्यातील बिलोचपुरा गावात धक्कादायक घटना

  • नवऱ्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला पकडून मारहाण केली

  • प्रियकराला वाचवण्याचा प्रयत्न करताना सासरच्यांनीही मारहाण केली

  • घटनेने कौटुंबिक वाद किती हिंसक होऊ शकतो, हे समोर आलं

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बिलोचपुरा गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांनाच धक्का बसला. रात्रीच्या अंधारात घरात चोर घुसल्याचा संशय आल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या रुमचा दरवाजा उघडला. मात्र रुमधील दृश्य पाहून नवऱ्याच्या संतपाचा चढला. रागाने लाल झालेल्या व्यक्तीनं पत्नी आणि तिच्या प्रियकराला जबर मारहाण केली. दरम्यान पत्नी आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी विनंती करत होती. परंतु तिच्या सासरच्यांनीही तिच्या प्रियकराला चोप दिला.

उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये मध्यरात्री ही घटना घडली. येथील एका तरुणाने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. संतापलेल्या पती आणि त्याच्या भावांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला काठ्या आणि चापटांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हाणामारीत पत्नीच्या प्रियकर जखमी झाला. त्याच्या नाका-तोंडातून रक्त निघत होतं. व्हिडिओमध्ये महिला आणि तिच्या प्रियकराच्या जीवाची याचना करताना दिसत आहे.

ही घटना ठाणे सिंघवली अहिर परिसरातील बिलोचपुरा गावातील आहे. येथील एका तरुणाचे शेजारच्या एका महिलेशी अवैध संबंध होते. पतीच्या अनुपस्थितीत दोघेही गुप्तपणे भेटत असायचे. बऱ्याच दिवसापासून या दोघांचे प्रेम प्रकरण चालू होते. दरम्यान महिलेच्या घराच्यांना जेव्हा त्यांचे प्रकरण समजलं त्यादिवशीही तो त्या महिलेला भेटायला गेला होता. शनिवारी रात्री महिलेचे कुटुंब घराच्या छतावर झोपले होते. तेव्हा महिलेचा प्रियकर तिच्या खोलीत घुसला. काही वेळाने खोलीतून आवाज आल्यावर कुटुंबाला चोर घरात शिरल्याचा संशय आला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी खाली जाऊन शोध सुरू केला.

महिलेच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. त्या रुममध्ये महिला आणि तिच्या प्रियकर अर्धनग्न व्यवस्थेत दिसले. हे दृश्य पाहताच त्या महिलेचा नवरा आणि त्याच्या भाऊ संतापला. त्यानंतर त्यांनी रुमचा दरवाजा बंद करत दोघांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान ती महिला तिच्या प्रियकराला वाचवण्यासाठी विनवणी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. संतप्त कुटुंबातील सदस्य तिला मारहाण करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Paratha: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर पराठा; नाश्त्याचा बेत होईल भारी

By-Election: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ? उद्धव ठाकरे काय करणार?

Pune : शक्तिवर्धक औषध घेणं जिवावर बेतलं ! धावता-धावता मानसिक संतुलन बिघडलं, पोलीस भरती दरम्यान घडला भयानक प्रकार

Maharashtra Live News Update : सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस-गारपिटीचा कहर; 3 एकर पपईची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT