Crime News Saam tv
क्राईम

Crime News: पती स्मार्ट दिसत नसल्यानं पत्नीचं भयंकर कृत्य; नवऱ्याला दिलं पेटवून

Crime News: उत्तरप्रेदशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

UP Crime News:

उत्तरप्रदेशमध्ये नवरा कुरुप दिसत असल्याने पत्नीने त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संभल येथे 26वर्षीय महिलेने नवरा चांगला दिसत नसलेल्या त्याची पेटवून हत्या केली. यानंतर तिला चार वर्षींची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आरोपी महिलेने 2017 मध्ये कुर्ह फतेहगढमधील बिचेटा येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय सत्यवीरसोबत लग्न केलं. तिचा पती काळा असल्याने त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. तिने वारंवार घटस्फोटाची मागणीदेखील केली होती. तरीही सत्यवीरने लग्न टिकवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना नोव्हेंबर 2028 मध्ये एक मुलगी झाली. मात्र, पत्नीच्या मनात पती वाईट दिसत असल्याचा राग कायम होता. त्याच रागातून 15 एप्रिल 2019 रोजी पती झोपेत असताना पत्नीने त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

यासंबंधित सत्यवीरचा भाऊ हरवीर याने आयपीसी कलम 302अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. त्यानुसार पत्नीला अटक करण्यात आलीये. कोर्टाच्या निकालानुसार, पतीने रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यूआधीच पत्नीने हत्या केल्याचे पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले होते.

मुरादाबाद जिल्हा रुग्णालयात असताना सत्यवीरने पोलिसांना स्टेटमेंट दिले होते. 'मी माझ्या बायकोला तिच्या माहेरी घेऊन गेलो होतो. तिथे तिच्या नातेवाईकांनी मला सांगितले की, तिला मी आवडत नाही. तिला मला सोडायचे आहे. त्याच रात्री आम्ही घरी परत आलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी झोपेत असताना माझ्या पत्नीने मला पेटवून दिले'. असं सत्यवीरने सांगितले.

सत्यवीरच्या स्टेंटमुळे त्यांच्या लग्नाचे भयानक वास्तव्य समोर आहे. आमचे लग्न झाल्यापासून माझ्या लूकमूळे माझ्या पत्नीला मी कधीच आवडलो नाही.त्यावरुन अनेकदा ती माझ्याशी भांडायची. माझा रंग खूप काळा आहे. मी तिला सोडावे नाहीतर ती मला पेटवून देईन. अशी धमकी द्यायची. परंतु आज तिने ही धमकी सत्यात उतरवली, असे तो म्हणाला. त्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला.

2021 मध्ये पोलिसांनी आरोपीविरोधात चार्जशीट दाखल केली. कोर्टाच्या कामकाजादरम्यान १० लोक तिच्याविरोधाच साक्ष देण्यासाठी पुढे आले. पत्नीने स्वतः च्या बचावासाठी आपली बाजू मांडली. तिने दावा केला की, मी माझ्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला भाजले होते. मात्र, न्यायालयाने पडताळणीत वेगळच वास्तव्य समोर आले. तेव्हा तिला प्रश्न विचारण्यात आले की, शेजारी मदतीसाठी धावले तेव्हा तिने दार का उघडले नाही. त्याचसोबत तिच्या हातावर कोणत्याही प्रकारच्या खुणा नव्हत्या.

सोमवरी कोर्टाच्या बाहेर पत्नीने ५ वर्षांच्या मुलीसोबत मीडियाला उत्तर दिली. तिने सांगितले की, मालमत्तेच्या वादामुळे तिच्या सासरच्यांनी तिला फसवले. याआधी तिने आर्थिक कारणांसाठी आणि मुलीच्या संगोपनासाठी शिक्षा कमी करण्यासाठी दंडाधिकाऱ्यांकडे अपील केले होते.

घडलेल्या घटनेवर सत्यवीरचे वडील महेंद्र सिंग यांनी समाधान व्यक्त केले. 'माझ्या मुलाला न्याय मिळाला. त्याला अत्यंत क्रूर घटनेचा सामना करावा लागला. मी न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी आहे'. असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT