Kalyan News: सत्तेत असूनही पोलिस दुजाभाव करतात, प्रशासन डावलतय; भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडली व्यथा 

Kalyan News : सत्तेत असूनही पोलिस दुजाभाव करतात, प्रशासन डावलतय; भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे व्यथा 
BJP Kalyan News
BJP Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण- डोंबिवलीत भाजप व शिवसेना शिंदे गटात धुसफूस सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. याच दरम्यान आमच्या कार्यकर्त्याला शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून मारहाण झाली. मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पोलिसांकडून दुजाभाव सुरू आहे. आमचे लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवकांना विकास कामासंदर्भात प्रशासनाकडून डावलले जात आहे; अशी व्यथा (BJP) भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर मांडली. (Breaking Marathi News)

BJP Kalyan News
Nana Patole News: महाराष्ट्रातील सरकार मोठ्या लोकांचे; नाना पटोले यांचा आरोप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी वैयक्तिक भेटीसाठी आले होते. यादरम्यान भाजप नेत्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कुणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख अप्रत्यक्षरित्या शिवसेना शिंदे गटाकडे होता. त्यामुळे भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वादावर पडदा पडल्याचे बोलले जात असले, तरी कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BJP Kalyan News
Amravati News: हिराबंबई जंगलात वाघाचा मृत्यू; शवविच्छेदनंतर समोर येईल मृत्यूचे कारण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी गार्हाणे मांडले. पोलीस प्रशासन, भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सहकार्य करत नसल्याचा आरोप करत पोलीस (Police) दुजाभाव करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. भाजप सत्तेत असूनही पोलीस भाजप कार्यकर्त्यांसोबत दुजाभाव करत असल्याचे फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच  विकास कामाबाबत देखील प्रशासन (Kalyan) भाजपच्या माजी नगरसेवक लोकप्रतिनिधींना डावलत असल्याचे देखील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या भेटीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांचा रोख सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाकडे होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com