UP Crime News Saam Tv
क्राईम

UP Crime News : लग्नाआधी चिंता, लग्नानंतर झटका; सख्ख्या भावांसोबत लग्नाच्या पहिल्याच रात्री घडलं भयंकर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hardoi Uttar Pradesh Crime News :

उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधू घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार झाल्या आहेत. या घटनेने परिसरातील लोकांना धक्का बसला आहे. दोन तरुणींनी सख्ख्या भावांशी लग्न केले. त्यानंतर लग्नाच्या पहिल्याच रात्री खीरीमध्ये विषारी पदार्थ मिसळून खाऊ घातला. त्यानंतर त्या दोघींनी घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला.

एका मध्यस्थी व्यक्तीने त्यांचे लग्न जमवले होते. लग्नापूर्वीच वरांकडून ठराविक रक्कम घेऊन त्यांचे लग्न लावून दिले. गावातील मंदिरात त्यांचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर घरी पोहचल्यावर या नववधूंनी खीर तयार केली. ती खीर सासरच्या व्यक्तींना आणि नवरदेवांना खाऊ घातली. खीरीमध्ये त्यांनी विषारी पदार्थ मिसळला होता. त्यामुळे सर्व जण बेशुद्ध झाले. दुसऱ्या दिवशी नवरा आणि सासरच्या व्यक्तींना जाग आली तोपर्यंत या तरुणी रोख रक्कम, दागिने घेऊन पळून गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी लगेच या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

हरडोईच्या ताडियावान भागातील भदयाळगाव येथील नरेश पाल यांना प्रदीप आणि कुलदीप अशी दोन मुले आहेत. मुलांचे लग्नाचे वय उलटून गेले असून त्यांचे लग्न न होत असल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत होते. त्यांचा मुलगा प्रदीप दिल्लीत लॉक बनवण्याच्या कारखान्यात काम करतो. तर दुसरा गावीच राहतो. दिल्लीत असताना लग्नाच्या बाबतीत गावातील इकबाल या व्यक्तींच्या संपर्कात आला होता. इकबालने दोन्ही मुलांचे लग्न करण्याचा विषय काढला. प्रदीप आणि इकबाल यांचे फोनवर बोलणे झाले. लग्न करण्यासाठी इकबाल याने ९० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही.

कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, इकबालने प्रदीप आणि त्याच्या आईचा नंबर काही लोकांना दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी प्रदीपची आई शिवकन्या यांना एक फोन आला. रवी उर्फ राजकुमार असे त्या व्यक्तीने नाव सांगितले. तो सीतापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचेही त्याने सांगितले. त्याने प्रदीपचे लग्न जुळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रदीपच्या आईने दुसऱ्या मुलाचेही लग्न करायचे असल्याचे सांगितले. त्यावर रवीने लखीमपुर जिल्ह्यात धौरहरा येथे त्याच्या दोन सख्ख्या बहिणी आहेत. त्यांच्याशी लग्न जुळवून देईल, असे सांगितले. मात्र, यासाठी ८० हजार रुपये द्यावे लागतील असेही सांगितले.

यानंतर प्रदीप आणि त्याच्या भावाने लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर दोन्ही मुलींचे फोटो शिवकन्या यांना पाठवण्यात आले. त्यानंतर कुटुंबियांनी लग्नाला होकार दिला. यानंतर रवीने नवरीसाठी दागिने बनवण्यास सांगितले. कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जवळपास १ लाख रुपयांचे दागिने बनवले होते. त्यानंतर २२ नोव्हेंबरला गावातील एका मंदिरात प्रदीप आणि त्याच्या भावाने लग्न केले.

लग्न झाल्यावर घरी पोहचले. त्यानंतर नववधूंनी सासरच्यांसाठी खीर बनवली. ही खीर खाऊन सर्व जण बेशुद्ध झाले. त्यांना जाग येण्याच्या आत त्या तरुणींनी घरातील दागिने, रोख रक्कम आणि इतर वस्तू घेऊन पळून गेले. यानंतर कुटुंबियांनी त्या महिलांची आणि रवीचा शोध घेतला. त्यांचा काहीच तपास लागला नाही. या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल केली असून आरोपींना अटक केली जाईल असं त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT