Banda police begin investigation after girl elopes with brother-in-law along with cash and jewellery. saam tv
क्राईम

बायकोच्या बहिणीला लावली फूस; घरातील दागिने, पैसे घेऊन दाजीसोबत मेहुणी पळाली

Woman Runs Away with Brother-in-Law : बांदा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एक मुलगी आपल्यादाजीसोबत पळून गेलीय. तिने घरातून १ लाख रुपये आणि दागिने चोरले आहेत. पोलिसांनी एफआयआर दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.

Bharat Jadhav

  • मुलगी दाजीसोबत पळून गेल्यामुळे परिवारात खळबळ उडाली.

  • मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार नोंदवलाय.

  • पोलिसांनी एफआयआर दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.

बांदा जिल्ह्यात एक मुलगी घरातून पैसे आणि दागिने घेऊन आपल्या दाजीसोबत पळून गेल्याचा प्रकार घडलाय. तरुणीने घरातून एक लाख रुपये आणि दागिने घेऊन पसार झालीय. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिलीय. पलानी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आणि तपास सुरू केला असून मुलीचा शोध घेत आहेत.

उत्तर प्रदेशातील बांदा येथे एक विचित्र घटना घडलीय. एक मुलगी आपल्या दाजीसोबत पळून गेली. पळून जाताने मुलीनं घरातील दागिने आणि पैसे चोरले, अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी दिलीय. मुलीचा त्वरीत शोध घ्यावा, अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केलीय. पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी पाळत ठेवून तिचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. ती लवकरच सापडेल आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असा पोलीस अधिकाऱ्यांचा दावा आहे.

ही घटना पैलानी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडलीय. वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या मुलीला तिच्या दाजीनं फूस लावून पळवून नेलंय. दाजीच्या बोलण्यात येत मुलीने घरातून एक लाख रुपये आणि दागिनेही सोबत नेले आहेत. चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी नातेवाईकांकडे आणि इतर ठिकाणी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांना ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

आपल्या मोठ्या मुलीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस मुलीचा शोध घेत आहेत. पैलानी पोलीस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर राजेश कुमार यांनी सांगितले की, एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केलीय. कुटुंबाने त्यांच्या मोठ्या जावयावर मुलीला पळवून नेल्याचा आरोप केला आहे. परंतु जावयानं आरोप फेटाळली आहेत. इतकेच नाही तर तो स्वत: आपल्या पत्नीसह पोलीस स्टेशनला आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : आज काय बनवायचं? हा प्रश्न आता कायमचा बंद, 'हा' घ्या तुमच्या महिन्याभराचा मेनू प्लॅन

Kolhapur : दबक्या पावलाने आले अन् कुटुंबासह कुत्र्यावर फवारलं गुंगीचं औषध, कोल्हापूरमध्ये चोरट्यांनी लाखोंवर हात साफ केला

Dating App: भयान वास्तव! डेटिंग अ‍ॅपवरचे ६५ टक्के युजर्स विवाहित अन् कमिटेड

Blouse Designs: जाड अन् बारीक अंगानुसार ब्लाऊज कसा निवडायचा?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

SCROLL FOR NEXT