Ulhasnagar News Saam Tv
क्राईम

Ulhasnagar News : बाल सुधारगृहातून ४ मुलींचे पलायन; सुधारगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Ulhasnagar News : उल्हासनगरमधील महिला आणि बाल सुधारगृहातून चार अल्पवयीन मुलींचं पलायन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोन मुलींना ताब्यात घेतलं असून दोन मुलींचा शोध सुरू आहे.

Alisha Khedekar

  • उल्हासनगरमधील महिला आणि बाल सुधारगृहातून चार मुलींनी पलायन केलं आहे.

  • या घटनेत दोन मुली पकडल्या गेल्या तर दोन मुली अद्याप फरार आहेत.

  • सुरक्षारक्षक जेवणासाठी गेल्याचा फायदा घेत मुलींनी पलायन केले.

  • सुधारगृहाच्या सुरक्षेवर आणि कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.

उल्हासनगरमधून धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. शहराच्या महिला आणि बाल सुधारगृहातून सहा अल्पवयीन मुलींनी पलायन केले आहे .यापैकी चार मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोन मुलींचा शोध सुरु आहे. या घटनेने सुधारगृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

मुलींनी कसं पलायन केलं ?

उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या वेळी सुरक्षारक्षक जेवणासाठी गेले असताना मुलींनी मुख्य प्रवेशद्वाराची चावी घेऊन पलायन केले. पोलिसांच्या हे लक्षात येताच त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र या मुली कुठेही सापडल्या नाहीत. काही पोलिसांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला असता त्यांना दोन मुली सापडल्या. मात्र अद्याप दोन मुली फरार आहेत.

या आधीही घडली होती घटना

उल्हासनगर शहराच्या महिला आणि बाल सुधारगृहातून काही महिन्यांपूर्वी ८ मुलींनी पलायन केले होते. पलायन केलेल्या मुलींनी परत आल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात, “आम्हाला इथे राहायचं नाही म्हणून आम्ही आपल्या घरी निघालो” असे सांगितले. मात्र यामागे केवळ घराची ओढ नसून सुधारगृहातील अनेक गैरसोयीही उघड झाल्या आहेत.

सुधारगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

दरम्यान, अल्पवयीन मुलींच्या सलग पलायनाच्या घटनांमुळे सुधारगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असून, प्रशासन आणि महिला बालविकास विभागाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेत दोन मुलींना शोधण्यात यश आले असून दोन मुली अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेल्या नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नालासोपारा शहरात संविधान बचाव रॅली

Karjat Tourism : कर्जतमध्ये लपलाय पांढरा शुभ्र धबधबा, पाहा नेमकं कसं जायचं?

Amruta Khanvilkar: उफ्फ क्या हे लूक है.... अमृताचा कातिल अंदाज, सौंदर्य पाहून पडाल प्रेमात

Crime News : MBBS च्या विद्यार्थिनीवर मित्रानेच केले अत्याचार; हॉटेलवर बोलावून बेशुद्धावस्थेत दुष्कृत्य, व्हिडिओही काढले

Tuesday Horoscope: पैसा, प्रेम सारं मिळणार, तुमच्या नशिबी काय? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT