Ulhasnagar Crime News Saam tv
क्राईम

Ulhasnagar Crime News: जुन्या भांडणाच्या रागातून तब्बल ५ मोटारसायकल जाळल्या; थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Crime News: उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ulhasnagar Crime News:

राज्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. भांडणातून एकमेकांना हाणामारी, खून अशा घटना समोर आल्या आहेत. अशातच उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये एका व्यक्तीने जुन्या भांडणाच्या रागातून मोटारसारयकल जाळल्यात.

रागाच्या भरात मोटारसारयकल जाळल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या व्यक्तीने तब्बल पाच मोटार सायकल जाळल्या आहेत. उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक तीन येथील रामदेव अपार्टमेंट या इमारतीत ही घटना घडलीये. घटनेने परिसरातील भीतीचं वातावरण पसरलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सर्व जण झोपेत असताना ही घटना घडला आहे. रात्री तीन वाजताच्या सुमारास मोटारसायकल जाळण्यात आल्या आहेत. विजय साधुराम बालानी यांच्या मनात जुन्या भांडणाचा राग होता. हाच राग मनात ठेवून त्यांनी हे कृत्य केले आहे. विजयने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच मोटार सायकलला आग लावली. यात मोटारसायकलचे नुकसान झाले आहे.

सुरूवातीला त्याने एका कापडाला लाईटरच्या साहाय्याने आग लावली. त्यानंतर हे कापड मोटारसायकलवर फेकले. यात वाहनांते मोठे नुकसान झाले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजवरुन आरोपीची ओळख पटली आहे. या घटनेनंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश बंडगर करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK : पासपोर्टचे रंग वेगवेगळे का असतात ? जाणून घ्या

Breaking News : तब्बल १२००० कोटींचा घोटाळा, जेपी ग्रुपच्या एमडीला ईडीने ठोकल्या बेड्या

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

NHAI Toll System : टोलनाक्यावरील रांगेपासून सुटका, 'या' हायवेवरून आता सुसाट प्रवास, केंद्र सरकारने आणली नवी योजना

Land Calcualtion: आता शेतजमीनीची मोजणी फक्त २०० रुपयात होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT