Varanasi Crime News Saam Digital
क्राईम

Crime News: आईच्या मृतदेहासोबत दोन बहिणींचं वर्षभर घरात वास्तव्य; कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून काळीज पिळवटून टाकणारी घटना बुधवार उघडकीस आली आहे. दोन बहिणी मागील वर्षभरापासून आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Varanasi Crime News

उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून काळीज पिळवटून टाकणारी घटना बुधवार उघडकीस आली आहे. दोन बहिणी मागील वर्षभरापासून आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वाराणसीत दोन तरूणी एक वर्षापासून आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या. उषा(वय ५२) असं मयत महिलेचं नाव असून पल्लवी(२७ वर्ष) आणि वैश्विकी (१८ वर्ष) असं दोन मुलीचं नाव आहे. लहान बहिण वैश्विकी दहावीत आहे तर मोठी मुलगी पदवीधर आहे. दोन्ही बहिणी आपल्या आईसोबत वाराणसीतील चित्तुपूर या भागात वास्तव्यास होत्या.

मागील वर्षभरापासून नातेवाईकांनी वारंवार प्रयत्न करूनही कोणीही घराचा दरवाजा उघडत नव्हतं. त्यानंतर नातेवाईकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर समोरील दृष्य पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. घरात आईचा मृतदेह आढळला तर दुसऱ्या खोलीत तरूणी बसल्या होत्या.

अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते

पोलिसांनी दोन्ही बहिणींची याबाबत चौकशी केली. त्यावेळी चौकशीदरम्यान पल्लवी आणि वैश्विकीने सांगितले की,आमचे वडील आमच्या लहान बहिणीसोबत लखनौमध्ये वेगळे राहतात. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आईचे दीर्घ आजाराने निधन झाले. परंतु याबाबतची माहिती आम्ही कोणालाही दिली नाही. आमच्याकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे देखील नव्हते. त्यामुळे वर्षभरापासून आम्ही मृतदेह घरात ठेवला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून मयत महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो पुढील तपासासाठी नजिकच्या रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News : डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट; पोलिसांकडून आरोपी PSI गोपाल बदनेवर मोठी कारवाई

Papad Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? मग कुरकुरीत पापडापासून बनवा 'हा' पदार्थ

Friday Horoscope: शुक्रवारची सुरुवात धमाकेदार बातमीने होईल, हाती आलेला पैसा जाण्याची शक्यता; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: कन्नडला टोमॅटो दोन रुपये किलो व्यापाऱ्यांकडून लूट

Heart Disease: कमी झोपेमुळे तुम्हीच देताय हार्ट अटॅकला आमंत्रण, ह्रदयाचे आणि झोपेचे नाते काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT