Shirdi News saam tv
क्राईम

Shirdi Crime: शिर्डीला पोलिस छावणीचे स्वरूप असताना एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, घटना सीसीटिव्हीमध्ये कैद

Shirdi News Robbery Crime: दुहेरी हत्याकांडानंतर पोलिस छावणीचे स्वरूप आलेल्या शिर्डीत चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. मध्यरात्री दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Dhanshri Shintre

शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर शहराला पोलिस छावणीचे स्वरूप असताना चोरट्यांनी थेट पोलिसांना आव्हान दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, चोरट्यांची पलायन करतानाची दृश्ये स्पष्ट दिसून येत आहेत.

शिर्डीत दुहेरी हत्याकांडानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत अवैध व्यवसाय आणि अतिक्रमणांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. तसेच, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन राबवले जात आहे. यामुळे काहीसा जनतेचा आत्मविश्वास परत मिळाल्यासारखा वाटत होता.

मात्र, या सर्व उपाययोजनांच्या दरम्यान मध्यरात्रीच्या वेळी दोन ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिक पुन्हा दहशतीच्या सावटाखाली आले आहेत. संतनगर भागात झालेल्या एका घरफोडीत लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. चोरीनंतर चोरटे कशा पद्धतीने पलायन करत होते, याचे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे, ज्यामुळे पोलिसांसाठी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

दुहेरी हत्याकांडातील आरोपींना जेरबंद केल्यानंतर नागरिकांमधील भीती काहीशी कमी झाली होती. मात्र, आता एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी होणे म्हणजे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा एकदा धोक्यात आल्याचे संकेत आहेत. सध्याच्या परिस्थितीत, पोलिसांवर नागरिकांचा विश्वास परत मिळवणे आणि चोरट्यांना जेरबंद करणे ही मोठी जबाबदारी आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस तपास वेगाने सुरू आहे. मात्र, शहरात पोलिस छावणी असूनही गुन्हेगारी प्रकार घडत असल्याने प्रशासनाला याबाबत अधिक कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

टिटवाळ्यात पाणीटंचाईचा कहर! पाणी आणायला गेलेल्या 3 चिमुकल्यांना भरधाव कारची धडक

Hair Care: केस गळती आणि डँड्रफ कमी करायचाय? मग केस धुण्याआधी लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

SCROLL FOR NEXT