two held for accepting bribe in dharashiv  Saam tv
क्राईम

Dharashiv Crime News : 3200 रुपयांची लाच घेताना जात पडताळणी कार्यालयातील दोघांना अटक, धाराशिव एसीबीची कारवाई

Dharashiv Latest Marathi News : जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तक्रारदाराने धाराशिव जिल्हा जात पडताळणी समीतीची कार्यालयात अर्ज दिला होता.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv :

जात पडताळणी प्रमाणपत्राची डिजिटल सही असलेली प्रिंट देण्यासाठी 3200 रुपयांची लाच घेताना जात पडताळणी कार्यालयातील दाेघांना एसीबीने रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर जात पडताळणी कार्यालयात खळबळ उडाली. या प्रकरणाचा आनंदनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत. (Maharashtra News)

एसीबीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात सापळा रचला. यामध्ये प्रकल्प सहाय्यक बुध्दभुषण दिलीपराव माने व शाहबाज शफीक सय्यद हे लाच घेताना सापळ्यात अलगद सापडले.

तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाचे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा जात पडताळणी समीतीची कार्यालयात अर्ज दिला होता. या प्रमाणपत्राची डिजिटल सही असलेली प्रिंट देण्यासाठी 3200 रुपयांची लाच मागण्यात आली हाेती. त्यानूसार तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नाेंदवली हाेती. एसीबीच्या अधिका-यांनी दाेघांना लाच घेताना अटक केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस कॉन्स्टबलचा रस्ते अपघातात मृत्यू, बातमी कळताच पत्नीला मोठा धक्का, निराशेतून धक्कादायक पाऊल

Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या घड्याळाची किंमत आशिया कपच्या प्राइज मनीपेक्षा ८ पट जास्त; किंमत ऐकून बसेल धक्का

Mumbai Crime: साहेब मला अटक करा मी..., बहिणीच्या बॉयफ्रेंडची हत्या करून आरोपी पोलिस ठाण्यात गेला; मुंबई हादरली

Kunkeshwar Temple : कोकण दर्शनात ‘कुणकेश्वर मंदिर’ ठरेल ट्रिपसाठी खास; वाचा नव्या डेस्टिनेशनचे वैशिष्ट्य

Jio Recharge Offer: बल्ले-बल्ले! जिओ दररोज देणार फ्री २.५ GB डेटा अन् ओटीटी सबस्क्रिप्शन फ्री, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT