Police investigating the spot in Murbad where missing elderly couple from Titwala was found dead saam tv
क्राईम

मुलीकडून पैशांसाठी तगादा, ७ दिवसांपासून बेपत्ता; टिटवाळ्यातील वयोवृद्ध दांपत्यासोबत काय घडलं? आत्महत्या की घातपात?

Titwala Missing Couple Found Dead: टिटवाळा येथून सात दिवसांपासून बेपत्ता असलेले एक वृद्ध जोडपे मुरबाडमध्ये मृतावस्थेत आढळले आहे. आर्थिक दबावामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे.

Bharat Jadhav

  • टिटवाळ्यातील वयोवृद्ध दांपत्य ७ दिवसांपासून बेपत्ता होते

  • मुरबाडमध्ये निर्जन ठिकाणी दोघांचे मृतदेह सापडले

  • आर्थिक तणावामुळे आत्महत्येचा प्राथमिक अंदाज

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या टिटवाळ्यातील वयोवृद्ध दांपत्य मृतअवस्थेत आढळलेत. या दांपत्याचे मृतदेह मुरबाड तालुक्यातील एका निर्जनस्थळी आढळून आले आहेत. महादू घरत (वय 85) आणि त्यांची पत्नी कमलाबाई घरत (वय 75) असे मृतांची नावे आहेत. त्यांच्यासोबत काय घडलं? दांपत्यानं आत्महत्या केली की त्यांची कोणी हत्या केली याचा तपास केला जातोय.

पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार मुलीने त्यांच्यांकडे पैशांसाठी तगादा लावला होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांच्या प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान हे दांपत्य 23 तारखेपासून हे घरातून बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या मुलीने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू होता.

दरम्यान, शोधमोहीम सुरू असतानाच मुरबाड परिसरातील एका निर्जनस्थळी या दोघांचे मृतदेह आढळून आले. ही माहिती मिळताच मुरबाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलेत आहेत. टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले की, बेपत्ता तक्रारीनंतर दोघांचा शोध सुरू होता, मात्र आता त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास मुरबाड पोलीस करत आहेत. ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबतही पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

खडवली नदीकाठी तरूणाचा मृतदेह आढळला

काही दिवसापूर्वी कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडवली नदीच्या काठावर अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. २१ एप्रिलला हा मृतदेह सापडला. तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० आहे. वृत्त प्रसिद्ध करेपर्यंत त्याची ओळख पटलेली नाहीये. खडवली नदीकाठच्या परिसरात तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर टिटवाळा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras Wishes : आली दिवाळी! मराठी, हिंदी आणि इंग्रजीत धनतेरसचे प्रियजनांना पाठवा खास मेसेज

Dhanteras 2026 : धनतेरसला पैसे उधार दिले तर घरात येते गरिबी? काय सांगते धार्मिक मान्यता?

ZP अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; घरात सापडलं अडीच किलो सोनं, 11 किलो चांदी

दिवाळीची मिठाई खाताना सावधगिरी बाळगा! मिठाईला चांदीचा वर्ख की अल्युमिनियम फॉईल?

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; NDA मधील मित्रपक्षाचा भाजपाला इशारा

SCROLL FOR NEXT