Beed Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : धक्कादायक! तोंडात कापड कोंबलं, स्टेजवरून उचललं; निर्जनस्थळी नेत नर्तकीवर सामूहिक अत्याचार

Bihar News : बिहारमधील सुपौल जिल्ह्यात विश्वकर्मा पूजनानंतर ऑर्केस्ट्रा नर्तकीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून तपास पोलीस स्टेशन सीमावादात अडकला आहे.

Alisha Khedekar

  • सुपौल जिल्ह्यात विश्वकर्मा पूजनानंतर महिला नर्तकीवर सामूहिक बलात्कार

  • पीडितेची प्रकृती गंभीर; रुग्णालयात उपचार सुरू

  • पतीच्या अत्याचारामुळे माहेरी राहणाऱ्या महिलेवर पुन्हा संकट

  • पोलिस स्टेशन सीमावादामुळे तपासात अडथळे

बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील ललितग्राम ओपी पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मीनिया पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ९ मधील एका गावात विश्वकर्मा पूजेसाठी आयोजित ऑर्केस्ट्रा कार्यक्रमादरम्यान मानवतेला लाजवेल अशी घटना घडली आहे. कार्यक्रमातून परतणाऱ्या २५ वर्षीय महिला नर्तकीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला असल्याची घटना घडली आहे.

या घटनेनंतर पीडितेची प्रकृती गंभीर झाली आणि तिला प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडितेने म्हटले आहे की, गुरुवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास चिंटू नावाच्या एका तरुणाने तिला स्टेजवरून उचलून नेले. वाटेत त्याचे दोन साथीदार त्याच्यासोबत सामील झाले. तिघांनी मिळून तिला एका अनोळखी ठिकाणी नेले, तोंडात कापड भरले आणि तिच्यावर क्रूरपणे अत्याचार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह दहा वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील रहिवासी राजू शर्माशी झाला होता. तिला चार मुले आहेत. पतीच्या अत्याचाराला कंटाळून ती गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या आईवडिलांच्या घरी राहत होती. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी तिने ऑर्केस्ट्रामध्ये नाचायला सुरुवात केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

डॉक्टरांनी प्राथमिक तपासात बलात्कार झाल्याचे सिद्ध केले आहे. तथापी ही घटना प्रतापगंज आणि ललितग्राम पोलिस स्टेशन हद्दीच्या सीमेवर घडल्याने, हे प्रकरण दोन्ही पोलिस स्टेशनमधील वादात अडकले आहे. पोलिस अधिकारी सध्या कोणतेही विशिष्ट भाष्य करण्यास टाळाटाळ करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीच्या निवडणुकीमध्ये न्यायालयाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा

Supreme Court: निवडणुका रद्द करू नाहीतर निकाल आम्ही देऊ: सर्वोच्च न्यायालय

मुलगी झाली म्हणून सासरकडून छळ; आयुष्य 'नकोसे' झाल्यानं महिलेने संपवली जीवनयात्रा

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी क्रिकेटचा महाकुंभमेळा होणार सुरू, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT